For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘डॉक्टर हू’मध्ये इंदिरा वर्मा

06:15 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘डॉक्टर हू’मध्ये इंदिरा वर्मा
Advertisement

सीरिजचा ट्रेलर सादर

Advertisement

‘डॉक्टर हू’च्या पुढील सीझनचा अधिकृत ट्रेलर जारी करण्यात आला आहे. डॉक्टर हू चा आगामी सीजन डॉक्टर आणि साथीदार रुबी संडे यांचे अनुसरण करतो. कारण ते  इंग्लंडमध्ये रीजेन्सी युगापासून युद्धग्रस्त भविष्याच्या जगापर्यंत रोमांचासोबत टाइम आणि स्थानाची यात्रा करतात. यादरम्यान त्यांचा सामान अविश्वसनीय मित्र आणि धोकादायक शत्रूंशी होतो, ज्यात एक भयानक बोगीमॅन आणि डॉक्टरचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली शत्रू देखील सामील आहे.

ट्रेलरमध्ये इंदिरा वर्मा यांच्या व्यक्तिरेखेची झलक दाखविण्यात आली आहे. कॅली कुकी (हेनपोकॅलिप्स) आगामी सीझनमध्ये दिसून येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पूर्ण ट्रेलरमध्ये अतिथी कलाकारांना दाखविण्यात आले असून यात अनीता डॉब्सन, यास्मीन फिन्नी, मिशेल ग्रीनिज, बोनी लँगफोर्ड, जिंक्स मॉनसून, जेम्मा रेडग्रेव, लेनी रश आणि एंजेला विंटर सामील आहे.

Advertisement

रसेल टी डेव्हिस शोरनर हे ‘डॉक्टर हू’च्या आगामी सीझनचे कार्यकारी निर्माते आणि लेखक आहेत. अतिरिक्त कार्यकारी निर्मात्यांमध्ये फिल कोलिन्सन, जोएल कोलिन्स, जूली गार्डनर आणि जेन ट्रँटर सामील आहेत. डॉक्टर हू ची निर्मिती बॅड वुल्फकडून डिस्ने ब्रँडेड टेलिव्हिजन आणि बीबीसीसाठी बीबीसी स्टुडिओसोबत करण्यात आली आहे. डॉक्टर हू चा पुढील सीझन 10 मे रोजी डिस्ने प्लसवर स्ट्रीम होणार आहे.

Advertisement
Tags :

.