For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनुदानाअभावी इंदिरा कॅन्टीन अडचणीत

10:01 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनुदानाअभावी इंदिरा कॅन्टीन अडचणीत
Advertisement

महापालिकेचे दुर्लक्ष : लाभार्थ्यांची पाठ, दर्जा खालावला

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, जेवणाचा निकृष्ट दर्जा आणि ग्राहकांची कमतरता आदी कारणांमुळे इंदिरा कॅन्टीन बंद अवस्थेत असल्याचे दिसत आहे. शहरात 2013-18 सालात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात प्रतिसादही चांगला मिळाला होता. मात्र, त्यानंतर या कॅन्टीनना उतरती कळा लागली आहे. शहरातील काही इंदिरा कॅन्टीन बंद अवस्थेत असल्याचे दिसत आहे. बसस्टँड रोडवर असलेले इंदिरा कॅन्टीन  मागील कित्येक दिवसांपासून बंद आहे. महापालिकेकडून पुरेशा अनुदानाअभावी इंदिरा कॅन्टीन अडचणी येऊ लागल्या आहेत. गोरगरीबांना कमी दरात नाष्टा आणि जेवणाची सोय व्हावी, यासाठी इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आली आहेत. मात्र, आहाराचा दर्जा, मनपाकडून योग्य अनुदान मिळत नसल्याने इंदिरा कॅन्टीन कूचकामी ठरू लागली आहेत. शिवाय नागरिकांनी देखील इंदिरा कॅन्टीनकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे इंदिरा कॅन्टीन ओस पडताना दिसत आहेत. शहरातील क्लब रोड, बसस्टँड रोड, आझमनगर, एपीएमसी आवार, नाथ पै सर्कल आदी ठिकाणी इंदिरा कॅन्टीन उभी करण्यात आली आहेत. शहरात येणाऱ्या गोरगरीबांना, कष्टकऱ्यांना केवळ 5 रुपयात नाष्टा आणि 10 रुपयांत जेवण पुरविणे हा कॅन्टीनचा उद्देश आहे. मात्र, विविध कारणांमुळे कॅन्टीनला नागरिकांचा प्रतिसाद कमी झाला आहे. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत येताच इंदिरा कॅन्टीनना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याकडेही आता दुर्लक्ष झाले आहे. शिवाय इंदिरा कॅन्टीनमध्ये भाजी-भाकरीही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कॅन्टीनमध्ये सुरळीत नाष्टा आणि जेवण मिळत नसल्याने भाजी-भाकरी मिळणार आहे का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे शहरातील गोरगरीब आणि कष्टकऱ्य्नां आर्थिक फटका बसू लागला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.