इंडिगोचा तिमाही तोटा 27 टक्क्यांनी कमी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडचा आर्थिक वर्ष 2027 च्या सप्टेंबर तिमाहीतील तोटा 27 टक्क्यांनी कमी झाला आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ तोटा 1,879 कोटीचा होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 2,582 कोटींचा तोटा झाला होता.
यावेळी झालेला तोटा 2,063 कोटींच्या सर्वसाधारण अंदाजापेक्षा कमी होता. तथापि, निकाल जाहीर झाल्यानंतर, तोटा अपेक्षेपेक्षा कमी म्हणजेच 1,879 कोटी असल्याचे स्पष्ट झाले. तोट्यात घट होण्यासोबतच, कंपनीच्या महसुलातही वाढ झाली आहे. कंपनीचा महसूल तिमाहीत 25.9 टक्क्यांनी वाढून 23,364 कोटी झाला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 18,555 कोटी होता.
इबीआयटीडीएआर 120.8टक्क्यांनी वाढला
इंडिगोचा इबीआयटीडीएआर म्हणजेच व्याज, कर, घसारा, निर्लेखन आणि भाडे यापूर्वीचा नफा सप्टेंबर तिमाहीत 120.8 टक्के वाढून 2,459.9 कोटी रुपयांचा झाला. एका वर्षापूर्वी तो 1,114.3 कोटीचा होता.
इंडिगोचे एकूण कर्ज 87,303 कोटींवर
सप्टेंबर 2026 अखेर इंडिगोचे एकूण कर्ज वार्षिक 16.7 टक्क्यांनी वाढून 87,303.1 कोटी झाले. एका वर्षापूर्वी कंपनीवर 74,813.8 कोटींचे कर्ज होते. या एकूण कर्जामध्ये 55,159.2 कोटींच्या भांडवली ऑपरेटिंग लीज दायित्वांचा समावेश आहे.
