इंडिगो बनली जगातील 6 वी सर्वात मोठी एअरलाईन कंपनी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सर्वात मोठी बातमी एअरलाईनशी संबंधीत असून यामध्ये इंडिगो एअरलाईन बाजार भांडवलानुसार 13 डिसेंबर 2023 रोजी जगातील सर्वात मोठी 6 नंबरची सर्वात मोठी एअरलाईन कंपनी बनली आहे. याच दरम्यान अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 2 पैशांनी घसरला आणि तो 83.40 रुपये प्रति डॉलर या सर्वाधिक नीच्चांकी पातळीवर बंद झाला असल्याची माहिती आहे. इंडिगो जगातील 6 व्या नंबरची सर्वात मोठी एअरलाइन कंपनी बनली आहे. मात्र याचदरम्यान कंपनीचे बाजारमूल्य 1.15 लाख कोटी रुपये राहिले आहे. याचे कारण म्हणजे सलग 12 दिवस समभागांमध्ये झालेल्या वाढीचा हा परिणाम राहिला असल्याची माहिती आहे. इंडिगोने अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सला मागे टाकले आहे. एअरलाइन्सची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनच्या समभागात सलगपणे तेजी राहिल्याने ही कामगिरी केली असल्याचे दिसून आले. बुधवारच्या सत्रात इंटरग्लोब एव्हिएशनच्या समभागात 58.55 रुपयांची वाढ होऊन ती 2,985 रुपयांच्या पातळीवर बंद झाली.