For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बजेट एअरलाइनमध्ये इंडिगो पहिल्या दहात

06:20 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
बजेट एअरलाइनमध्ये इंडिगो पहिल्या दहात
Advertisement

स्कायट्रॅक्सकडून यादी जाहीर : इंडिगो यादीत नवव्या स्थानी

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जागतिक एअरलाइन अवॉर्डस 2026 यादी जाहीर झाली असून त्यात इंडिगो या हवाई कंपनीला 3 विभागीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. स्कायट्रॅक्स या एअरलाइन रेटिंग एजन्सीने नुकतीच यादी जाहीर केली आहे. त्यात मलेशियाची एअर एशिया विमान सेवा कंपनी बजट एअरलाइन गटात अव्वल ठरली आहे. महत्त्वाचे म्हणजे एअर एशियाने सलग 17 व्यांदा अव्वल स्थान राखले आहे.

Advertisement

या जागतिक पुरस्कारात इंडिगोला वर म्हटल्याप्रमाणे 3 विभागीय पुरस्कार तर एअर इंडिया या आणखी विमान कंपनीला 4 विभागीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याउलट पाहता भारताचे शेजारी देश पाकिस्तान, बांगला देश व श्रीलंका यासारख्या देशातील एअरलाइन कंपन्यांना आघाडीवरच्या शंभर यादीतही जागा मिळू शकलेली नाही. इंडिगो ही कंपनी भारत व दक्षिण आशियात 16 व्यांदा उत्कृष्ठ बजेट एअरलाइन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सातत्याने 17 व्यांदा नंबर वन

मलेशियाची प्रसिद्ध विमान कंपनी एअर एशिया ही 2010 पासून सातत्याने दरवर्षी सर्वोत्कृष्ठ बजेट विमान सेवा कंपनी ठरली आहे. एअर एशियाच्या कौलालंपूरहून जवळपास 25 देशांना 166 ठिकाणी विमानसेवा कार्यरत आहे.

विभागीय गटात इंडिगोला 4 पुरस्कार

जागतिक एअरलाइन अवॉर्डस 2026 मध्ये एअर इंडियाला रिजनल व दक्षिण आशिया विभागात 4 पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय एअर इंडियाला बजेट एअरलाइन एअर इंडिया एक्स्प्रेसला भारत व दक्षिण आशियात बेस्ट लो कॉस्ट एअरलाइन्स यादीत चौथे स्थान प्राप्त झाले आहे.

इंडिगोचा विस्तार

इंडिगो या विमान सेवा कंपनीकडे एकंदर 400 हून अधिक विमानांचा ताफा आहे. दररोज 2200 हून अधिक विमान फेऱ्या कंपनीच्या होत असून यात देशांतर्गत सेवेतील कंपनीचा वाटा 60 टक्के इतका आहे. 137 शहरांना ज्यात 94 देशांतर्गत तर 43 आंतरराष्ट्रीय शहरांना कंपनी विमान सेवा देते.

टॉप 10 कंपन्या पाहुया

1       एअर एशिया                मलेशिया

2      स्कूट                           सिंगापूर

3      वुएलिंग                        स्पेन

4      युरोग्रुप                       जर्मनी

5   इबेरिया एक्स्प्रेस              स्पेन

6    वोलोटिया                       स्पेन

7       ट्रान्सविया                 नेदरलँड

8      फ्लायनस                  सौदी अरब

9     इंडिगो                       भारत

10    एलिजिएंट एअर                अमेरिका

Advertisement
Tags :

.