महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सेन्सेक्स-निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत

06:55 AM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विक्रीच्या दबावात बाजाराची घसरण : जागतिक बाजारात मात्र सकारात्मक वातावरण

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरुन बंद झाले. चालू आठवड्यातील दुसऱ्या दिवशीच्या कामगिरी दरम्यान बाजारात विक्रीचा कल राहिला होता. यामुळे सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक हे नुकसानीसह बंद झाले आहेत.

याच दरम्यान जागतिक बाजारात सकारात्मक कल दिसून आला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 377.50 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 69,551.03 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 90.70 अंकांनी नुकसानीत राहत निर्देशांक 20,906.40 वर बंद झाला आहे.

बाजारातील व्यापक स्थितीमध्ये बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांचे निर्देशांक 0.4 ते 0.27 टक्क्यांनी प्रभावीत राहिले. निफ्टी मिडकॅप 100 वर राहिले. शेअर बाजारात तेजीत राहिलेल्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने एचडीएफसी लाईफ, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज ऑटो आणि एसबीआय लाईफ यांचे समभाग राहिले तर अन्य कंपन्यांमध्ये बीपीसीएल, अपोलो हॉस्पिटल, सनफार्मा आणि मारुती सुझुकी यांचे समभाग हे घसरणीत राहिल्याचे दिसून आले.

सर्वाधिक परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये मंगळवारी जेनसोल इंजिनिअरींग, डोडला डेअरी, पिडीलाइट इंडस्ट्रीज आणि फिनोलेक्स केबल यांचे समभाग तेजीत राहिले असून कोरोमंडल इंटरनॅशनल, होम फर्स्ट फायनान्स, आयएसएमटी लिमिटेड, गार्डन रीच शिप बिल्डरण् ओपाला, फेडरल बँक, सीएमएस इन्फो सिस्टम्स, युनी पार्ट्स इंडिया, महिंद्रा होलिडेज, गेटवे डिस्ट्रिक्ट पार्क आणि अशोक लेलँड यांचे समभाग घसरणीत राहिले.

मुख्य अहवालांच्या आकडेवारीकडे लक्ष

मागील सप्ताहात विविध अहवालांची आकडेवारी सादर होणार असल्याचे संकेत दिले होते. यामध्ये सांख्यिकी अहवाल व अन्य उत्पादनांसह अन्य काही मुख्य  आकडेवारी सादर करण्यात येणार आहे.  आणि ती सादर करण्यात आल्यानंतरच बाजारातील कामगिरीची मुख्य दिशा निश्चित होणार असल्याचे संकेत sअभ्यासकांनी व्यक्त केले होते. याचाच परिणाम म्हणून महागाई संदर्भातील आकडेवारीचा प्रभाव मंगळवारच्या सत्रात दिसुन आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article