एचडीबी फायनान्शियल समभाग तेजीत राहण्याचे संकेत
06:50 AM Mar 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई:
Advertisement
एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमीटेड हा समभाग येत्या काळामध्ये तेजीत राहण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीज यांनी आपल्या ताज्या अहवालात सदरच्या समभागाच्या भावाबाबत सकारात्मक वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. येत्या काळात कंपनीचा समभाग 900 रुपयांपर्यंत पोहोचू शकणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. मागच्या बंद भावाच्या तुलनेमध्ये कंपनीने समभाग यापुढे 40 टक्क्यांपर्यंत वर चढू शकतो, असे म्हटले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये समभाग 17 टक्के इतका वाढला आहे.
Advertisement
Advertisement