चालू आर्थिक वर्षात कोळसा आयात कमी होण्याचे संकेत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कोल इंडिया लिमिटेड(सीआइएल) यांच्याकडून आयात करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या निविदांच्या व्यतिरीक्त देशात कोळसा आयात चालू आर्थिक वर्षाच्या दरम्यान 11 टक्क्यांनी घटून 18.6 कोटी टनावर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
कोळसा मंत्रालाच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात एकूण 18.6 कोटी टन कोळसा आयात करण्यात येणार आहे. यामध्ये बिगर कोकिंग कोळशाची हिस्सेदारी 13 कोटी टन आणि कोकिंग कोळशाचा हिस्सा हा 5.6 कोटी टन राहणार असल्याची शक्यता मांडली आहे. यामध्ये आर्थिक वर्ष 2024 ते 25 साठी 17.2 कोटी टन, 2027-28 साठी 17.3 कोटी टन आणि 2029 ते 30 करीता 17 कोटी टन कोळसा आयात राहणार असल्याचा अंदाज मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
दुसऱया बाजूला 2021-22 च्या दरम्यान 21 कोटी टन कोळशाची आयात झाली. तर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 21.5 कोटी टन आणि 2019-20 च्या दरम्यान ही आयात 24.9 कोटी टन राहिली होती.