भारत युवा संघाचा झिम्बाब्वेवर दणदणीत
विजय यू-19 विश्वचषक : सामनावीर विहानचे नाबाद शतक, वैभवचे वेगवान अर्धशतक, म्हात्रे-उद्धव मोहनचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/ बुलावायो, झिम्बाब्वे
मध्यफळीतील युवा फलंदाज व सामनावीर विहान मल्होत्राचे नाबाद शतक, अभिज्ञान कुंडू व वैभव सूर्यवंशी यांची अर्धशतके आणि उद्धव मोहन व आयुष म्हात्रे, अंबरीश यांच्या भेदक माऱ्यामुळे भारताच्या युवा संघाने यू-19 विश्वचषक स्पर्धेतील सुपर सिक्स फेरीच्या पहिल्या सामन्यात यजमान झिम्बाब्वे युवा संघावर 204 धावांनी दणदणीत विजय मिळविला.
गट साखळी फेरीत अमेरिका, बांगलादेश, न्यूझीलंड यांचा पराभव केल्यानंतर आक्रमक खेळाचे प्रदर्शन सुपरसिक्स फेरीतही कायम ठेवले. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने 50 षटकांत 8 बाद 352 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर झिम्बाब्वेचा डाव 37.4 षटकांत 148 धावांत गुंडाळून मोठा विजय साकार केला. त्यांच्या डावात लीरॉय चिवाउलाने 62, कियान ब्लिग्नॉटने 37, तातेंदा चिमुगोरोने 29 धावा जमविल्या. भारताच्या उद्धव मोहनने 20 धावांत 3, आयुष म्हात्रेने 14 धावांत 3, अंबरीशने 19 धावांत 2, खिलन पटेलने एक गडी