For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्रीसमध्ये भारताची युपीआय सेवा सुरु

06:52 AM Jul 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
ग्रीसमध्ये भारताची युपीआय सेवा सुरु
Advertisement

आता भारतातील 10 देशांमध्ये डिजिटल पेमेंट करण्याची सेवा : वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे सेवेचे लोकार्पण

Advertisement

वृत्तसंस्था,  नवी दिल्ली

भारताची युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) सेवा आता ग्रीसमध्ये सुरू झाली आहे. या डिजिटल पेमेंट नेटवर्कमध्ये सामील होणारा ग्रीस हा नवीन देश ठरला आहे. युरोबँक आणि एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड यांच्या भागीदारीत सुरू झालेल्या या सेवेचा थेट डेमो अथेन्समधील युरोबँकच्या मुख्यालयातही पाहण्यात आला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत हा डेमो आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी अथेन्सच्या अधिकृत दौऱ्यादरम्यान या सेवेचा थेट डेमो पाहिला. ते म्हणाले की, यूपीआयची जागतिक स्वीकृती हे सिद्ध करते की भारताच्या तंत्रज्ञानावरील जगाचा विश्वास वाढत आहे. हे तंत्रज्ञान सीमापारही चांगले काम करू शकते. आता युपीआय सेवा 10 देशांमध्ये होणार उपलब्ध ग्रीसच्या या नेटवर्कमध्ये सामील झाल्यानंतर, आता जगातील 10 देशांमध्ये युपीआयचा  वापर विविध स्वरूपात करता येईल. हे भारतीय प्रवाशांसाठी QR-कोड आधारित व्यापारी पेमेंटपासून ते सीमापार रेमिटन्स सेवांपर्यंत (पैसे हस्तांतरित करणे) विविध सुविधा देते.

ग्रीसच्या आधी कंबोडियामध्ये युपीआय सुरू झाली ग्रीसच्या अगदी आधी, कंबोडिया या यादीत समाविष्ट होणारा 9वा देश ठरला. यासाठी, एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने तेथील Aण्थ्DिंA बँकेसोबत भागीदारी केली आहे. याअंतर्गत, कंबोडियाच्या राष्ट्रीय क्यूआर कोड ‘ख्प्QR‘ द्वारे सीमापार युपीआय पेमेंट सुरू करण्यात आले.

यापूर्वी, सिंगापूर, युएई, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, भूतान, कतार आणि श्रीलंका या आठ देशांमध्ये युपीआय स्वीकारले जात होते. याची सुरुवात फ्रान्समधील आयफेल टॉवरपासून झाली युरोपमध्ये  युपीआयच्या विस्तारात फ्रान्सचा खूप महत्त्वाचा वाटा राहिला आहे. पॅरिसमधील आयफेल टॉवरवरून 2024 साली युपीआय सुरू करण्यात आले. ही सेवा नंतर नाईसमधील गॅलरीज लाफायेटसारख्या प्रमुख रिटेल ठिकाणांपर्यंत विस्तारण्यात आली.

युपीआयचे भविष्य आणि त्याचा जागतिक विस्ताराचे काय?

युपीआय हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) द्वारे विकसित केले आहे, जे मोबाईल अॅप्सद्वारे त्वरित डिजिटल पेमेंटची सुविधा देते. त्याच्या जागतिक विस्ताराचा मुख्य उद्देश परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी पेमेंट प्रक्रिया सुलभ करणे हा आहे. हे सीमापार हस्तांतरणामध्ये येणारा खर्च आणि त्रास कमी करण्यास देखील मदत करत आहे.

परदेशात युपीआय कसे काम करते?

भारतीय प्रवासी परदेशात आंतरराष्ट्रीय रोमिंग सक्रिय केलेल्या युपीआयअॅपद्वारे स्थानिक क्यूआर कोड (जसे की कंबोडियामध्ये ख्प्QR किंवा ग्रीसमध्ये युरोबँक मर्चंट नेटवर्क) स्कॅन करून थेट त्यांच्या भारतीय बँक खात्यातून पेमेंट करू शकतात.

Advertisement
Tags :

.