For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खालिदा झिया यांना भारताची श्रद्धांजली

07:00 AM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
खालिदा झिया यांना भारताची श्रद्धांजली
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांच्या निधनानंतर भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाला भेट दिली. त्यांनी बांगलादेश उच्चायुक्तालयातील शोकपुस्तकावर स्वाक्षरी करत भारताच्या वतीने तीव्र शोकभावना व्यक्त केल्या. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह अनेक दक्षिण आशियाई देशांचे वरिष्ठ प्रतिनिधी बांगलादेशमधील खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले होते. खालिदा झिया यांना ढाका येथील शेर-ए-बांगला नगर येथे त्यांचे पती, माजी राष्ट्रपती झियाउर रहमान यांच्या शेजारी दफन करण्यात आले. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या दीर्घकाळ प्रमुख असलेल्या झिया यांचे मंगळवारी पहाटे ढाका येथे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले होते. निधनसमयी त्या 80 वर्षांच्या होत्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.