भारताचा कल 4-जी ,5-जी उपकरणांच्या निर्यातीकडे
सर्व स्वदेशी उपकरणे निर्यात करण्याचा केंद्राचा विचार : गुंतवणूक आकर्षित करण्याचा उद्देश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 मध्ये 4जी आणि 5जी ची सर्व स्वदेशी उपकरणे निर्यात करण्याचा केंद्राचा विचार आहे. या वर्षी या बाबतीत केंद्राचे धोरण गुंतवणूक आकर्षित करणे आणि तंत्रज्ञानाचा वापर परराष्ट्र धोरणाचा प्रमुख भाग आहे. केनिया, मॉरिशस, पापुआ न्यू गिनी आणि इजिप्त सारख्या अनेक देशांनी भारताच्या दूरसंचार तंत्रज्ञानामध्ये रस दाखवला आहे.
दूरसंचार विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘कमीत कमी 15 जागतिक दूरसंचार ऑपरेटर आणि नऊ देशांशी द्विपक्षीय चर्चा करण्यात आली आहे. या सर्व विनंत्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील आणि 2024 च्या शेवटच्या सहामाहीत भारताचा दूरसंचार विभाग परदेशात मार्ग काढेल. दूरसंचार विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सच्या नेतृत्वाखाली संघाची स्थापना करण्यात आली.
सी-डॉटच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्हाला अनेकांनी तांत्रिक चौकशी केली आहे. बीएसएनएलमध्ये उपकरणे पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, आम्ही व्यावसायिक तत्वावर पुरवू. ही उपकरणे जागतिक मानकांची पूर्तता करतात आणि आम्ही त्यांच्या निर्यातीसाठी कालमर्यादा निश्चित करत आहोत.
सरकारने 2022 पासून उपकरणांची संपूर्ण श्रेणी आणि त्यांच्याशी संबंधित तंत्रज्ञान इतर देशांना सादर केले. जी 20 डिजिटल इकॉनॉमी चर्चेदरम्यान सरकारने तंत्रज्ञानाचे मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग केले.
2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका आणि फ्रान्सच्या भेटीदरम्यान भारतानेदेखील याची ओळख करून दिली होती. जागतिक दूरसंचार क्षेत्रात भारताला चांगल्या स्थितीत ठेवण्याची सरकारची इच्छा आहे. जेणेकरून देशात त्याद्वारे अधिक गुंतवणूक आकर्षित होईल. सध्या फक्त पाच देशांमध्ये- यूएस, स्वीडन, फिनलँड, दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये 4 जी-5जी लास्ट माईल उपकरणे आहेत.
या देशांच्या कंपन्या 4जी आणि 5जी उपकरणांची मानके, किंमती आणि बाजार परिस्थिती ठरवतात. स्वीडिश कंपनी एरिक्सन, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोन्हींसाठी 5जी पायाभूत सुविधा उभारत आहे.