For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनसोबत भारताचा 155 अब्ज डॉलर्सचा व्यापार

06:18 AM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
चीनसोबत भारताचा 155 अब्ज डॉलर्सचा व्यापार
Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

भारत आणि अमेरिका यांच्यात दिर्घकाळ व्यापारकरार अडकलेला असतानाच दुसरीकडे चीनसोबतचे संबंध व्यापाऱ्याच्या बाबतीत सुधारल्याचे सुचिन्ह समोर आले आहे. भारताने चीनसोबत 155.6 अब्ज डॉलर्सचा व्यापार केला असल्याची माहिती मिळते आहे. हा व्यापार 2025 या कॅलेंडर वर्षामध्ये झाला असून मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाहता दोन्ही देशातील व्यापार 12 टक्के इतका वाढला आहे. भारताकडून चीनला होणारी निर्यात 9 टक्के इतकी वाढली आहे. दोन्ही देशांमध्ये आर्थिक आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून चांगल्या संधी निर्माण होत असल्याचे एकंदर परिस्थितीवरुन समोर येते आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यात चाललेल्या व्यापार कराराला अंतिम रुप आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर व्यापारशुल्क 50टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर घटविल्याने या दोन्ही देशातील व्यापाऱ्याला येणाऱ्या काळात गती मिळणार आहे. याचदरम्यान भारताने जगातील दुसऱ्या नंबरची मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनबरोबर आपला व्यापार वाढविला आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चिनी नववर्षाच्या एका कार्यक्रमामध्ये भारतातील चिनचे राजदूत जू फेई हेंग यांनी वरील व्यापाराची माहिती दिली आहे. भारत आणि चीन यांच्यातील व्यापार हा विक्रमी स्तरावर पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले. मागच्या ऑगस्टमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमुळे दोन्ही देशातील व्यापाऱ्याला यशस्वी चालना मिळाली. भारत आणि चीन या दोन्ही देशामधील संबंध या दरम्यान अधिक दृढ झाले असल्याचे फेई हेंग यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.