For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा सप्टेंबरमध्ये बांगलादेश दौरा

06:10 AM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचा सप्टेंबरमध्ये बांगलादेश दौरा
Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी घेषणा केली की ते यावर्षी सप्टेंबरमध्ये भारतासोबत तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 आंतराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करेल.तथपि, बांगलादेशमध्ये स्थिर सरकार नसतानाच्या सध्याच्या परिस्थितीत बीसीसीआय तिथे प्रवास करण्यास सहमत होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.बीसीबीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार,तीन एकदिवसीय सामने 1,3 अणि 6 सप्टेंबर रोजी खेळले जातील,तर टी-20 सामने 9,12 आणि 13 सप्टेंबर रोजी खेळले जातील.

भारतीय संघ मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी 28 ऑगस्ट रोजी बांगलादेशमध्ये पोहोचेल.गेल्या वर्षी जुलैमध्ये, भारताचा बांगलादेश दौर अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आला होता आणि सहा सामन्यांची मर्यादित षटकांची मालिका एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी पुढे ढकलण्यात आले होती.बांगलादेश आणि भारत यांच्यातील मर्यादित षटकांची मलिका, ज्यात तीन एकदिवसी अणि तीन टी-20 आंतराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे,सप्टेंबर 2026 पर्यंत पुढे ढकलण्यास परस्पर सहमती दर्शवली आहे, असे बीसीसीआयने गेल्या जुलैमध्ये एका निवेदनात कळवले होते.दोन्ही मंडळांमधील चर्चेनंतर, दोन्ही संघांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वचनबद्धता आणि वेळापत्रकाची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.बीसीबी या बहुप्रतिक्षित मालिकेसाठी सप्टेंबर 2026 मध्ये भारातचे स्वागत करण्यास उत्सुक आहे.दौऱ्याच्या सुधारित तारखा आणि सामने योग्य वेळी जाहिर केले जातील असे त्यात पुढे म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.