For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सॉफ्टवेअर निर्यातीत भारताची दमदार कामगिरी

06:00 AM Feb 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
सॉफ्टवेअर निर्यातीत भारताची दमदार कामगिरी
Advertisement

आयटी क्षेत्रामध्ये भारताची चमक आता अधिक गडद होत असून मोठ्या शहरांसह टायर 2, टायर 3 शहरेदेखील आपली कामगिरी उंचावत असल्याचे पहायला मिळाले आहे. सॉफ्टवेअर निर्यातीचा विचार करता बेंगळूरसोबत इतर मध्यम शहरेसुद्धा आपले योगदान देण्यामध्ये कोणतीही कसर ठेवत नसल्याचे पहायला मिळाले आहे. आयटी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सॉफ्टवेअर   टेक्नॉलॉजी पार्कची योजना आखली आहे. देशातील 65 शहरांमध्ये हे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क स्थापन करण्यात आले असून यामध्ये 57 शहरे ही टायर 2 व टायर 3 आहेत, हे विशेष होय. 2019-2020 च्या तुलनेमध्ये 2023-24 आर्थिक वर्षात सॉफ्टवेअरमध्ये निर्यात दुप्पट करण्यात आली आहे. आयटी क्षेत्रासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या बेंगळूर शहराने 200हजार कोटीची असणारी निर्यात 400 हजार कोटींवर नेली आहे. यापाठोपाठ हैद्राबाद, पुणे, चेन्नई, मुंबई यांचाही वाटा मोलाचा राहिला आहे. हैद्राबाद शहरामध्ये सॉफ्टवेअरची निर्यात 50हजार कोटीची झाली होती. जी 2023-24 वर्षात 120 हजार कोटींवर पोहोचली आहे. पुण्यानेही सॉफ्टवेअर निर्यातीत दमदार कामगिरी केली असून 50 हजार कोटीची 2019-2020 ला असणारी निर्यात आजघडीला 100 हजार कोटींवर पोहोचली आहे. चेन्नई आणि मुंबई या शहरांनीही सॉफ्टवेअर निर्यातीत लक्षणीय कामगिरी नोंदवली आहे. 50 हजार कोटींच्या खाली असणारी निर्यात जवळपास 70 हजार कोटीपर्यंत पोहोचली आहे. टायर 2, टायर 3 शहरांचा वाटा पहायला गेल्यास कोची आणि भोपाळ यांनी चांगली कामगिरी नोंदवली आहे. कोचीने 988 कोटींची सॉफ्टवेअर निर्यात 2023-24 आर्थिक वर्षात केली आहे. तर भोपाळने याच अवधीत 45 कोटीची सॉफ्टवेअर निर्यात करण्यामध्ये यश मिळविले

Advertisement

आहे.

आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती आणि कर्नाटकातील दावणगेरी येथूनही सॉफ्टवेअर निर्यात लक्षणीयरीत्या वाढली आहे. यानंतर या निर्यातीमध्ये गांधीनगर, कोईमत्तूर, जयपूर, मोहाली, विशाखापट्टण, नाशिक, इंदोर, मणीपाल, पाँडेचेरी, शिलॉन, सूरत, श्रीनगर आणि त्रिची यासारख्या टायर2, टायर3 शहरानेसुद्धा सॉफ्टवेअर निर्यात करण्यामध्ये आपली उत्तम कामगिरी केली आहे.

Advertisement

बेंगळूर ही राजधानी आयटी राजधानी म्हणून जरी गणली जात असली तरी कल्पक तंत्रज्ञानाच्या बाबतीत हे शहर मोठे हब म्हणून समोर आलेले आहे. एवढेच नव्हे तर आता ही राजधानी निर्मिती (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रामध्येही योगदान देण्यामध्ये आघाडीवर राहिली आहे. निर्मिती क्षेत्रामध्ये रोजगार देण्याचे प्रमाण बेंगळूरमध्ये 21 टक्के इतके असल्याचे एका सल्लागार कंपनीने अलीकडेच म्हटले होते. या शहरांनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबई निर्मिती क्षेत्रामध्ये दुसऱ्या नंबर वर राहिली आहे. 16 टक्के इतका वाटा निर्मिती क्षेत्रामध्ये रोजगार देण्यात मुंबईचा लागतो. इतर क्षेत्राच्या तुलनेमध्ये निर्मिती क्षेत्र वेतनवाढीमध्ये पुढाकार घेणार असल्याचे बोलले जात आहे. निर्मिती कंपन्या आणि नव्या आयटी कंपन्यांच्या वेतनामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये फरक असू शकतो. निर्मिती हे क्षेत्र असे आहे की, जिथे कमीत कमी वेतन दिले जाते. जिथे 6 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. परंतु आज घडीला नव्याने स्थापन झालेल्या आयटी कंपन्या मात्र वेतन देण्यामध्ये खूप पुढे पोहोचल्या आहेत. 6 लाख ते 25 लाखापर्यंत वेतन देण्यामध्ये त्या पुढाकार घेतात. 25 लाखांपेक्षा अधिकचे पॅकेज आयटी आणि निर्मिती दोन्ही क्षेत्रामध्ये दिले जाते. निर्मिती क्षेत्रामध्ये वेतनवाढीबाबतची पाहणी केली असता पश्चिम आणि दक्षिण भारतातील शहरांनी सरासरी वेतनामध्ये वाढ केलेली आहे. पूर्व आणि उत्तर भागातील शहरांमध्ये निर्मिती क्षेत्राने त्या तुलनेने कमी वेतनवाढ दिली आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दक्षिण आणि पश्चिम भारतातील शहरांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांची उपलब्धता हे आहे. या भागामध्ये कुशल कर्मचाऱ्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक कंपन्या या दोन भागांमध्येच सोयीच्या शहरांमध्ये आपले निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी इच्छुक असतात, असे पहायला मिळते.

                -दीपक कश्यप

Advertisement
Tags :

.