For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताची शॉर्ट रेंज डिफेन्स सिस्टीम सज्ज

07:00 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताची शॉर्ट रेंज डिफेन्स सिस्टीम सज्ज
Advertisement

कोठूनही लॉन्च करणे शक्य : वाहतूक करणेही सोयीस्कर : पोखरणमध्ये यशस्वी चाचणी

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

राजस्थानमधील पोखरण फायरिंग रेंज येथे अतिशय लघु पल्ल्याच्या (शॉर्ट रेंज) हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या तीन यशस्वी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. ही क्षेपणास्त्र प्रणाली कमी उंचीवरील हवेच्या धोक्मयांना अगदी कमी अंतरावर रोखण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या यंत्रणेतील क्षेपणास्त्र आणि लाँचर सहजपणे कुठेही नेले जाऊ शकते. यापूर्वी, फेब्रुवारी 2024 आणि सप्टेंबर 2022 मध्ये ओडिशातील चांदीपूर चाचणी श्रेणीतून अशाच प्रकारच्या क्षेपणास्त्राच्या दोन यशस्वी चाचण्या करण्यात आल्या होत्या. चौथ्या पिढीतील अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराचे अभिनंदन केले.

Advertisement

कोणत्याही मोठ्या शहराच्या किंवा सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणाच्या सुरक्षेसाठी अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीची क्षेपणास्त्रे आवश्यक असतात. याची बांधणी हैदराबादस्थित भारतीय संशोधन केंद्राने (आरसीआय) डीआरडीओ आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने केली आहे. भारताने या वषी मे महिन्यात स्वदेशी ऊद्रम-2 हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. ओडिशाच्या किनारपट्टीवर सुखोई-30 एमके-आय या लढाऊ विमानातून हे प्रक्षेपण करण्यात आले. डीआरडीओने बनवलेले 350 किमीच्या स्ट्राईक रेंजचे हे क्षेपणास्त्र नवीन पिढीचे रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र आहे. ते शत्रूराष्ट्राचे टेहळणी, दळणवळण, रडार आणि जमिनीवरील कमांड आणि कंट्रोल सेंटर नष्ट करू शकते.

Advertisement
Tags :

.