महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताची आज जर्मनीशी उपांत्य लढत

06:32 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कनिष्ठ वर्ल्ड कप हॉकी : स्पेन-फ्रान्स दुसरा उपांत्य सामना

Advertisement

वृत्तसंस्था/ कौलालंपूर

Advertisement

येथे सुरू असलेल्या कनिष्ठांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताची उपांत्य लढत बलाढ्या जर्मनीशी गुरुवारी होत असून हा मोठा अडथळा पार करण्याचे दिव्य भारतीय संघाला करावे लागणार आहे. अंतिम फेरी गाठल्यास या स्पर्धेच्या इतिहासातील भारताची ही चौथी वेळ असेल.

उपांत्यपूर्व लढतीत भारतीय संघाने जिगरबाज व निर्धारी खेळाचे प्रदर्शन करीत नेदरलँड्सवर विजय मिळविला. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या नेदरलँड्सवर 4-3 असा रोमांचक विजय मिळविला. मध्यंतराला भारतीय संघ 0-2 असा तर तिसऱ्या सत्रात 2-3 असे पिछाडवर पडला होता. पण जबरदस्त प्रतिकार करीत डचवर रोमांचक विजय मिळविला आणि उपांत्य फेरी गाठली. कर्णधार उत्तम सिंगने आघाडीवर राहत सामना संपण्यास तीन मिनिटे असताना विजयी गोल नोंदवला तर उपकर्णधार अरायजीत सिंग हुंदालने दोन गोल नोंदवले. दबावाखाली खेळण्याची आता संघाला सवय झाली आहे. आशिया कपच्या अंतिम लढतीत पाकविरुद्ध आणि सुलतान जोहोर चषक स्पर्धेत कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत दडपणाखाली खेळूनच आम्ही विजय मिळविलाय, असे उत्तम सिंग म्हणाला. आधीच्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये खेळलेले पाच खेळाडू या संघातही आहेत. त्यामुळे थोडाफार मिळालेला अनुभवही उपांत्य लढतीत उपयुक्त ठरू शकेल, असेही तो म्हणाला.

उपांत्य लढतीत पिछाडीवर पडूनही विजय मिळविल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. मात्र त्यांना या सामन्यात बचावात्मक धोरण अवलंबत आक्रमक हॉकी या बलस्थानावर जास्त लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. नेदरलँड्सविरुद्ध भारतीय संघ बॅकफूटवर होता आणि प्रारंभी बचावात्मक खेळत होता. याचाच त्यांना फटका बसला. पण यात वेळेत सुधारणा करीत आक्रमक खेळावर भर दिला आणि एक संघर्षपूर्ण विजय मिळविण्यात ते यशस्वी ठरले. मात्र जर्मनी संघाचा बचाव भक्कम असल्याने तो भेदणे भारताला कठीण जाऊ शकते. प्रतिआक्रमण करण्यावर त्यांचा अधिक भर असतो, हे दिसून आले आहे.

भारताने या वर्षात चार वेळा जर्मनीशी मुकाबला केला असून चारही वेळा ते पराभूत झाले आहेत. यातील शेवटचा पराभव सुलतान जोहोर चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झाला होता. याशिवाय 2021 च्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्येही उपांत्य फेरीत भारताला जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ही मालिका खंडित करण्यास भारतीय यावेळी सज्ज झाला आहे. जर्मनी संघ अजेय संघ नाही, त्याला हरविता येते. पण त्यासाठी आखलेल्या योजनेनुसार खेळ करण्याची गरज आहे, असे प्रशिक्षक सीआर कुमार म्हणाले. दुसरा उपांत्य सामना स्पेन व फ्रान्स यांच्यात होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#hockey#social media#sports
Next Article