महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारताचा कॅनडावर दणदणीत विजय

06:55 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कनिष्ठ महिला हॉकी वर्ल्ड कप : अन्नू, दिपी मोनिका टोपो, मुमताझ खान यांची हॅट्ट्रिक

Advertisement

वृत्तसंस्था/ सांतियागो

Advertisement

एफआयएच कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी जोरदार सुरुवात करताना कॅनडावर तब्बल 12-0 गोलनी दणदणीत विजय मिळविला.अन्नू (4, 6, 39 वे मिनिट), दिपी मोनिका टोपो (21), मुमताझ खान (26, 41, 54, 60), दीपिका सोरेंग (34, 50, 54), नीलम (45) यांनी भारताचे गोल नोंदवले. भारताने प्रारंभापासूनच आक्रमक खेळ केला आणि चौथ्या व सहाव्या मिनिटाला अन्नूने पेनल्टी कॉर्नर्सवर दोन गोल नेंदवून भारताला आघाडीवर नेले. दोन गोलांची आघाडी घेतल्यानंतरही भारताने आक्रमक धोरण कायम राखत कॅनडावर दबाव ठेवला. मात्र पहिल्या सत्रात भारताला आणखी गोल नोंदवता आले नाहीत. दुसऱ्या सत्रातही आक्रमकता कायम ठेवत भारतानेच वर्चस्व राखले. वारंवार सर्कलमध्ये घुसखोरी करीत दिपी मोनिका टोपो व मुमताझ खान यांनी मैदानी गोल नोंदवत आघाडी वाढवली.

कॅनडालाही एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्यावर त्यांना गोल नोंदवता आला नाही. मोठी आघाडी घेतल्यानंतरही भारताने तिसऱ्या सत्रातही खेळाचा वेग कमी केला नाही. दीपिका सोरेंगने संघाचा पाचवा गोल केल्यानंतर अन्नूने वैयक्तिक हॅट्ट्रिक पूर्ण केली तर मुमताझने वैयक्तिक दुसरा गोल केला. लगेचच नीलमने पेनल्टी कॉर्नरवर संघाचा आठवा गोल नोंदवला. चौथ्या सत्रातही गोल करण्याचा सिलसिला भारताने कायम राखला. या सत्रात दीपिक सोरेंग व मुमताझ खान यांनी हॅट्ट्रिक पूर्ण करीत भारताचा एकतर्फी विजय निश्चित केला. भारताची पुढील लढत शुक्रवारी जर्मनीविरुद्ध होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article