For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा विंडीजवर 8 गड्यांनी दणदणीत विजय

06:54 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचा विंडीजवर 8 गड्यांनी दणदणीत विजय
Advertisement

कोहलीच्या वनडेतील 15 हजार धावा पूर्ण, शुभमन गिलचे शतक, सामनावीर कुलदीप यादवचे चार बळी, ग्रीव्ह्जचे शतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था, तिरुवनंतपुरम

विराट कोहली आणि कर्णधार शुभमन गिल यांची दमदार शतके तसेच सामनावीर कुलदीप यादवच्या 4 बळींच्या जोरावर रविवारी येथे झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान भारताने विजयी सलामी देताना विंडीजचा 50 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. जस्टीन ग्रीव्ह्जचे दमदार शतक तसेच जॉन कॅम्पबेल आणि अमीर जंगू यांची अर्धशतके वाया गेली. विंडीजने 50 षटकात 7 बाद 295 धावा जमवित भारताला विजयासाठी 296 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर भारताने 41.4 षटकात 2 बाद 300 धावा जमविल्या. भारतातर्फे कुलदीप यादवने 40 धावांत 4 गडी बाद केले.

Advertisement

आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल यांनी भारताच्या डावाला दमदार सुरुवात करुन देताना 12 षटकात 74 धावांची भागिदारी केली. रोहित शर्माने आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करताना 35 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 32 धावा जमविल्या. अल्झारी जोसेफच्या चेंडूवर पुन्हा उत्तुंग षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो अँड्य्रुकरवी झेलबाद झाला. . दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणाऱ्या कर्णधार गिलला विराट कोहलीकडून चांगली साथ लाभली. भारताने 15.5 षटकात 1 बाद 100 धावांपर्यंत मजल मारली होती. गिलने 49 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

गिल, कोहली यांची दीडशतकी भागीदारी

शर्मा बाद झाल्यानंतर गिल आणि कोहली यांनी दमदार फलंदाजी करत दुसऱ्या गड्यासाठी 151 धावांची दीडशतकी भागिदारी केली. गिलने 96 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह शतक झळकविले. वनडे क्रिकेटमधील गिलने हे अकरावे शतक चौकार ठोकून पूर्ण केले. मात्र शतक झाल्यानंतर चेसने त्याला झेलबाद केले. गिलने 108 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह 110 धावा झळकविल्या. भारताला यावेळी विजयासाठी 51 धावांची गरज होती.

कोहलीचे शतक

विराट कोहलीने गिल बाद झाल्यानंतर फलंदाजीची सुत्रे स्वत:कडे घेतली. त्याने वनडे क्रिकेटमधील आपले विक्रमी 55 वे शतक 74 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने झळकाविले. तसेच त्याने वनडे क्रिकेटमधील 15 हजार धावांचा टप्पाही ओलांडला. वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर हा पराक्रम करणारा तो जगातील दुसरा फलंदाज आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 55 शतके आणि 79 अर्धशतके नोंदविली आहेत. कोहलीने रुतुराज गायकवाडसमवेत तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 75 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला 8 गड्यांनी दणदणीत विजय मिळवून दिला. कोहलीने केवळ 88 चेंडूत 9 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 139 तर गायकवाडने नाबाद 13 धावा जमविल्या. भारताच्या डावामध्ये 13 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले.

विंडीजची शतकी सलामी

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. मात्र जॉन कॅम्पबेल आणि जस्टिन ग्रीव्ह्ज या सलामीच्या जोडीने भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर आक्रमक फलंदाजी करताना 19.2 षटकात 135 धावांची शतकी भागिदारी केली. 20 व्या षटकात कुलदीप यादवने कॅम्पबेलला प्रसिद्ध कृष्णाकरवी झेलबाद केले. कॅम्पबेलने 60 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 62 धावा जमविल्या. कॅम्पबेलने रवींद्र जडेजाच्या पहिल्या षटकात 2 षटकार आणि 1 चौकार ठोकून आपले अर्धशतक 49 चेंडूत नोंदविले.

विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 10 षटकात 85 धावा झोडपल्या. ग्रीव्हजने 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. प्रसिद्ध कृष्णाने कार्टिला गिलद्वारे झेलबाद केले. त्याने 13 धावा जमविल्या. कुलदीप यादवने कर्णधार शाय होपला जडेजाकरवी झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 12 धावा केल्या. ग्रीव्ह्जने 104 चेंडूत 12 चौकारांसह शतक झळकविले. भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर ग्रीव्ह्जने स्वीपचे फटके अधिक मारत धावा घेतल्या. असाच एक फटका मारताना तो कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 108 चेंडूत 12 चौकारांसह 101 धावा जमविल्या. कुलदीप यादवने आपल्या या षटकातील पुढील चेंडूवर अँड्य्रुला खाते उघडण्यापूर्वी रोहित शर्माकरवी झेलबाद केले. विंडीजची यावेळी स्थिती 35.4 षटकात 5 बाद 198 अशी होती. विंडीजची सलामीची जोडी बाद झाल्यानंतर त्यांचे आणखी 4 फलंदाज 63 धावांत तंबूत परतले.

अमीर जंगूने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून नाबाद अर्धशतक झळकवले. जंगू आणि चेस या जोडीने सहाव्या गड्यासाठी 52 धावांची भागिदारी केली. प्रसिद्ध कृष्णाने चेसचा त्रिफळा उडविला. त्याने 32 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. नितीशकुमार रे•ाrने फोर्डला 7 धावांवर झेलबाद केले. अमीर जंगूने 43 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 58 धावा जमविल्या. मोती 4 धावांवर नाबाद राहिला. विंडीजच्या डावात 4 षटकार आणि 29 चौकार नोंदविले गेले. शेवटच्या 10 षटकात विंडीजने 82 धावांची भर घालताना 2 गडी गमविले. जंगूने 38 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. जंगूने फोर्ड समवेत सातव्या गड्यासाठी 38 धावांची भागिदारी केल्याने विंडीजला 295 धावांपर्यंत मजल मारता आली. भारतातर्फे कुलदीप यादवने 40 धावांत 4 तर प्रसिद्ध कृष्णाने 60 धावांत 2 तसेच नितीशकुमार रे•ाrने 45 धावांत 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : विंडीज 50 षटकात 7 बाद 295 (ग्रीव्ह्ज 101, कॅम्पबेल 62, अमीर जंगू नाबाद 58, चेस 24, होप 12, कार्टी 13, अवांतर 14, कुलदीप यादव 4-40, प्रसिद्ध कृष्णा 2-60, नितीशकुमार रे•ाr 1-45), भारत 41.4 षटकात 2 बाद 300 (विराट कोहली नाबाद 139, शुभमन गिल 110, रोहित शर्मा 32, ऋतुराज गायकवाड नाबाद 13, अवांतर 6, अल्झारी जोसेफ व चेस प्रत्येकी 1 बळी

Advertisement
Tags :

.