For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा थायलंडवर 20-1 दणदणीत विजय

06:52 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचा थायलंडवर 20 1 दणदणीत विजय
Advertisement

दीपिका सेहरावतचे विक्रमी 9 गोल, नवनीतचे 4, ऋतुजाचे 3 गोल

Advertisement

वृत्तसंस्था, काकामिगाहारा (जपान)

उत्कृष्ट लयीत असलेल्या ड्रॅग फ्लिकर दीपिका सेहरावतने आपली प्रभावी कामगिरी कायम राखत एकाच सामन्यांत विक्रमी 9 गोल केले. तिच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने थायलंडचा 20-1 असा धुव्वा उडवला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला हॉकीच्या गट ब मध्ये सलग तिसरा विजय नोंदवला.

Advertisement

पेनल्टी कॉर्नरवर दीपिकाने 2, 8, 9, 24, 33, 36, 39, 51 आणि 57 व्या मिनिटाला रोखठोक गोल केले. तिने मिळालेल्या सर्व 9 संधींचे गोलामध्ये रुपांतर करून हा विक्रम रचला. या एकतर्फी सामन्यात नवनीत कौरने 4, 29, 35 आणि 51 व्या मिनिटाला गोल केले. ऋतुजा दादासो पिसाळने 10, 11, 47 व्या मिनिटाला गोल करून हॅट्ट्रीक पूर्ण केली तर नेहा गोयल 19, लालरेम्सियामी 26, साक्षी राणा 29 आणि कर्णधार सलिमा टेटेने 45 व्या मिनिटाला गोल नोंदविले. भारताच्या गोलचा रतीब सुरू ठेवला. थायलंडचा एकमेव गोल सुपांसा सामन्सोने 57 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर व्हेरिएशनद्वारे केला. भारत आपला पुढील सामना शुक्रवारी यजमान जपानविरुद्ध खेळणार आहे. तीन सामन्यांत तीन विजयांसह भारत पूल बीमध्ये जपानच्या पुढे आघाडीवर आहे. 12 संघांच्या या स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. सामन्यांच्यासुरुवातीपासूनच भारताने थायलंडच्या बचावफळीवर वर्चस्व गाजवले आणि दीपिकाने पेनल्टी कॉर्नवर गोल करत आघाडी घेतली. नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये नुकत्याच झालेल्या एफआयएच विश्वचषकात ऐतिहासिक पाचवे स्थान मिळवणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यांमधील आपला फॉर्म कायम राखला. याआधी भारताने उझबेकिस्तान आणि इंडोनेशियाविरुद्ध अनुक्रमे 19-0 आणि 17-1 असे दणदणीत विजय मिळवले होते.

या सामन्यांपूर्वी 11 गोल (उझबेकिस्तानविरुद्ध 8 आणि इंडोनेशियाविरुद्ध तीन) करणाऱ्या दीपिकाने भारताचे खाते उघडले आणि त्यानंतर नवनीतने आघाडीदुप्पट केली. दीपिकाने आपल्या ड्रॅग फ्लिक्समध्ये अचूकता राखत सेटपीसद्वारे सहजपणे थायलंडच्या जाळीत चेंडू धाडले. आक्रमक फळीत ऋतुजाची कामगिरी उत्कृष्ठ होती. तिने योग्य वेळी योग्य ठिकाणी उपस्थित राहून आलेले पास गोलच्या दिशेने वळवले. त्याचवेळी लालरेम्सियामी आणि नवनीत यांनी प्रत्येकी दोन फील्ड गोल्स केले आणि 29 व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकचेही गोलमध्ये रुपांतर केले. ज्यामुळे मध्यंतरापर्यंत भारताकडे 11-0 अशी भक्कम आघाडी होती. मध्यंतरानंतरही भारतीय खेळाडूंनी आपले वर्चस्व कायम राखले आणि साक्षी तसेच कर्णधार सलिमा यांनीही फील्ड गोल्स करत गुणफलकावर आपली नावे नोंदविली.

Advertisement
Tags :

.