महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सौर ऊर्जा स्थापनेत भारताचा 6 महिन्यात विक्रम

06:58 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

गेल्या सहा महिन्यांमध्ये 15 गिगावॅट इतक्या सौर ऊर्जा स्थापनेचे काम पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भारतामध्ये 2024 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये अशाप्रकारे सौर ऊर्जेची स्थापना करण्याचा हा एकप्रकारे विक्रमच असल्याची माहिती मर्कम कॅपिटल यांच्या अहवालामध्ये प्रसिद्ध झाली आहे.

Advertisement

2023 मध्ये पाहता सोलर बसवण्याच्या क्षमतेमध्ये 282 टक्क्यांची वृद्धी दिसून आली आहे. भारताने जानेवारी ते जून 2023 या कालावधीमध्ये 3.89 गिगावॅट सोलर क्षमता जोडली होती. त्या तुलनेमध्ये 2024 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये 15 गिगावॅट इतकी सोलर क्षमता जोडली गेली आहे. हा एक प्रकारचा विक्रमच असल्याचे मानले जात आहे.

87 गिगावॅटपर्यंत पोहचली क्षमता

यायोगे 2024 च्या जूनपर्यंत भारताची एकूण स्थापन केलेली सोलर ऊर्जा क्षमता 87.2 गिगावॅटवर पोहोचली आहे. यामध्ये 87 टक्के वाटा हा युनिट प्रकल्पांच्या माध्यमातून उचलला जात असून 13 टक्के रूफटॉप सोलरच्या माध्यमातून वाटा उचलला जात आहे.

280 गिगावॅटचे उद्दिष्ट

ज्या पद्धतीने सोलर क्षमता वाढवली जात आहे ती पाहता 2024 हे वर्ष सोलर ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत महत्त्वाचे योगदान देणारे असणार असल्याचा विश्वास मर्कम कॅपिटलचे समूह सीईओ राज प्रभू यांनी म्हटले आहे. 2030 पर्यंत 280 गिगावॅट इतकी क्षमता स्थापित करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article