महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जागतिक स्तरावर भारताचा वेगवान विकास

12:21 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदार डॉ. देविया राणे यांचे प्रतिपादन, वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालयात गोवा मुक्तीदीन साजरा

Advertisement

वाळपई : जागतिक स्तरावर भारताचा वेगवान विकास होत आहे. सर्वसामान्यांना विविध  कल्याणकारी योजनांचा फायदा मिळत आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2024 सालामध्ये पुन्हा एकदा केंद्रात भाजपाची सत्ता सत्तारूढ होणार आहे. केंद्र व गोव्यामध्ये भाजपाचे डबल इंजिन सरकार असल्यामुळे विकासाचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. संघर्ष व जीवाची पर्वा न करता स्वतंत्र सैनिकांनी गोवा मुक्ती दिन उदयास आणला. यामुळे आपल्याला आज मुक्तपणे फिरता येत आहे. याची प्रत्येकाने जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्ये मतदारसंघाचे आमदार तथा गोवा वन विकास महामंडळाच्या चेअरमन डॉ देविया राणे यांनी केले.

Advertisement

सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित गोवा मुक्ती दिन सोहळ्यात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास सत्तरी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी प्रवीण परब, मामलेदार दशरथ गावस, संयुक्त मामलेदार विष्णू राणे व गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे यांची खास उपस्थिती होती. प्रत्येक स्वतंत्र सैनिकांचा संघर्ष व त्याग याची प्रत्येकाने आठवण ठेवणे गरजेचे आहे. आज आपण समाजामध्ये मुक्तपणे वावरू शकतो. स्पष्टपणे बोलू शकतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार प्राप्त झालेला आहे. मात्र या अधिकाराचा गैरवापर होणार नाही याची विशेष काळजी प्रत्येकाने घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे असे यावेळी डॉ. देविया राणे यांनी सांगितले.

ग्रामीण व शहरी भागामध्ये अंतर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून डबल इंजिन सरकार काम करीत आहे. येणाऱ्या काळात तालुक्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहे. नुकतेच 44 कोटी खर्चून सत्तरी तालुक्याच्या वेगवेगळ्या ग्रामीण व शहरी भागामध्ये वीज सुधारणा करण्यासाठी कामाला सुऊवात झालेली आहे. हा बदलता विकास फक्त भाजपा सरकार मुळेच शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  सुऊवातीला आमदार डॉ. देविया राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या हस्ते दीपस्तंबाची पूजा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरीश कामत यांनी केले तर शेवटी संयुक्त मामलेदार विष्णू राणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची खास उपस्थिती होती. वाळपई युनिटी व अवर लेडी ऑफ लुर्डस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुरेख देशभक्तीपर गीत सादर केले .यावेळी वातावरणामध्ये चांगल्या प्रकारचे रंगत आली. वाळपई पोलीस स्थानकाच्यावतीने ध्वजाला सलामी दिली. यावेळी आमदार डॉ देविया राणे यांनी परेडची पाहणी केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article