महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फिफा मानांकनात भारताचे स्थान कायम, अर्जेन्टिना अग्रस्थानी

06:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

फिफाने जगभरातील फुटबॉल संघांची ताजी क्रमवारी जाहीर केली असून भारताने 124 वे स्थान कायम राखले आहे. वर्ल्ड चॅम्पियन्स व नुकतीच कोपा अमेरिका स्पर्धा जिंकलेल्या अर्जेन्टिनाने मात्र आपले अग्रस्थान आणखी भक्कम केले आहे. जूनमध्ये जाहीर झालेल्या फिफा मानांकनात भारताचा पुरुष राष्ट्रीय संघाची 2026 वर्ल्ड कप पात्रतेची तिसरी फेरी गाठण्यात अपयशी ठरल्यानंतर तीन स्थानांनी घसरण झाली होती. त्यावेळी कतार व अफगाणिस्तान संघांकडून भारताला पराभव स्वीकारावे लागले होते. गेल्या डिसेंबरपासून भारतीय संघाची घसरण चालूच आहे. गेल्या वर्षी मात्र त्यांनी टॉप शंभरमध्ये स्थान मिळविताना 99 वा क्रमांक घेतला होता. पण त्यानंतर त्यांची कामगिरी खालावत गेल्याने क्रमवारीतही घसरण झाली आहे.

Advertisement

आशिया देशांचा विचार करता, भारतीय संघ 22 व्या स्थानावर कायम असून लेबनॉन, पॅलेस्टाईन, व्हिएतनाम हे संघ भारतापेक्षा वरच्या क्रमांकावर आहेत. कोपा अमेरिका स्पर्धा सलग दुसऱ्यांदा जिंकणाऱ्या अर्जेन्टिनाने अग्रस्थान भक्कम केले आहे तर या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा फ्रान्स त्यांच्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे. युरो चषकाचा नवा चॅम्पियन्स संघ स्पेनने पाच स्थानांची प्रगती करीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली तर उपविजेत्या इंग्लंडने एका स्थानाची प्रगती करीत चौथे स्थान मिळविले आहे. ब्राझीलची एका स्थानाने घसरण झाली असून ते पाचव्या, बेल्जियम सहाव्या, नेदरलँड्स सातव्या, पोर्तुगाल आठव्या (2 ची घसरण) कोलंबिया नवव्या (3 ने प्रगती) स्थानावर आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article