For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताची सलामीची लढत उझ्बेकबरोबर

12:51 PM May 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताची सलामीची लढत उझ्बेकबरोबर
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

ताश्कंदमध्ये 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या 20 वर्षांखालील वयोगटातील एएफसी आशिया चषक 2027 च्या चायनातील पात्र फेरी स्पर्धेमध्ये भारताचा सलामीचा सामना उझ्बेकबरोबर होणार आहे. या पात्र फेरीच्या स्पर्धेतील ड्रॉ काढण्यात आला असून भारत ब गटात आहे. या गटात उझ्बेक, सिरीया आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. सदर स्पर्धेतील सामने एकेरी राऊंडरॉबिन पद्धतीने खेळविले जातील. आता एएफसी 20 वर्षांखालील वयोगटातील आशिया चषक पात्र फेरीची फुटबॉल स्पर्धा नव्या स्वरुपात घेतली जाणार आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात होईल. या नव्या पद्धतीनुसार बढती आणि पदावनत्ती असे दोन टप्पे राहतील. सदर स्पर्धेत 32 संघांचा समावेश असून ते 8 गटात विभागण्यात आले आहेत. प्रत्येक गटात चार संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील विजेता संघ तसेच विविध 8 गटातील दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सर्वोत्तम सात संघ चीनमध्ये होणाऱ्या 20 वर्षांखालील वयोगटाच्या एएफसी आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. भारतीय फुटबॉल संघाचा उद्देश या प्रमुख स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे राहील. 2006 नंतर भारतीय फुटबॉल संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरु शकला नाही. 2006 साली या स्पर्धेचे यजमानपद भारताने भूषविले होते.

  • गट अ) प्रजासत्ताक कोरिया, किर्जीस्तान, फिलिपीन्स, लेबनॉन,
  • गट ब) उझ्बेक, सिरीया, भारत, बांगलादेश
  • गट क) इराण, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, पॅलेस्टीन
  • गट ड) जॉर्डन, ताजिकिस्तान, बहरीन, अफगाण
  • गट इ) सौदी अरेबिया, कतार, ओमान, हाँगकाँग
  • गट फ) इराक, थायलंड, युएई, तुर्की
  • गट ग) जपान, येमेन, कंबोडिया, कुवेत
  • गट च) ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मलेशिया, लाओस

डेव्हलपमेंट टप्प्याचा गट

Advertisement

  • गट आय) मंगोलिया, गुआम, नेपाळ, उत्तर मारियाना आयलंड्स
  • गट जे) चीन तैपेई, सिंगापूर, भूतान, मकाव
  • गट के) म्यानमार, मालदिव, ब्रुनेई, दारुसलेम आणि श्रीलंका
Advertisement
Tags :

.