For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुलांच्या विभागात भारताचे पदक निश्चित

06:22 AM Jul 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुलांच्या विभागात भारताचे पदक निश्चित
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

बँकॉकमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलांच्या विभागात भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हाँगकाँगचा 3-1 असा पराभव करुन आपले किमान कांस्यपदक निश्चित केले आहे. तसेच या कामगिरीमुळे भारतीय मुलांच्या संघाने पुढील वर्षी होणाऱ्या विश्व युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी थेट पात्रता सिद्ध केली आहे. बँकॉकमधील स्पर्धेत मात्र भारतीय मुलींचे आव्हान संपुष्टात आले आहे.

भारत आणि हाँगकाँग यांच्यात झालेल्या लढतीमध्ये पहिल्या सामन्यात हाँगकाँगच्या ली हो हिने भारताच्या प्रियानुज भट्टाचार्यचा 11-6, 7-11, 11-8, 11-8 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पिबी अभिनंदने हाँगकाँगच्या अल्व्हीनचा 8-11, 11-7, 11-3, 5-11, 11-4 अशा पाच गेम्समधील लढतीत पराभव करत भारताला बरोबरी साधून दिली. भारताच्या एम. आर. बालमुरगनने हाँगकाँगच्या लो कीटचा 11-8, 11-4, 11-7 असा पराभव करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतरच्या शेवटच्या सामन्यात भारताच्या अभिनंदने हाँगकाँगच्या हो हिचा 11-9, 9-11, 11-5, 11-6 असा पराभव करत हाँगकाँगचे आव्हान संपुष्टात आणले. आता भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना टॉप सिडेड चीनबरोबर होणार आहे.

Advertisement

या स्पर्धेत 19 वर्षांखालील वयोगटातील मुलींच्या विभागात हाँगकाँगने भारताचा उपांत्यपूर्व फेरीत 3-1 अशा फरकाने पराभव केल्याने भारताचे मुलींच्या विभागातील आव्हान संपुष्टात आले. आता पुढील वर्षी होणाऱ्या विश्व युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय कनिष्ठ मुलींच्या संघाला पात्रता फेरी खेळावी लागणार आहे.

Advertisement
Tags :

.