India Iran aid | युद्धाच्या आगीत भारताचा माणुसकीचा ओलावा! इराणला पाठवली वैद्यकीय मदतीची पहिली खेप
भारताकडून इराणच्या 'रेड क्रेसेंट'ला जीवरक्षक औषधांचा पुरवठा
नवी दिल्ली - इस्रायल-अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराणला वैद्यकीय मदतीचा पहिला साठा पाठवला आहे. अत्यावश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याचा समावेश असलेला हा साठा इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द केला.भारतातील इराणच्या दूतावासाने या मदतीबद्दल भारतीय जनतेचे आभार मानले आहेत.
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि युद्धाच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने पुन्हा एकदा आपली मानवतावादी संवेदनशीलता दाखवून दिली आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही संकटाच्यावेळी भारताने अनेक देशांना मदतीसाठी पुढाकार घेतलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आखातातील युद्धस्थितीमुळेसध्या बरेच नुकसान झालेल्या इराणलाही भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. ही मदत यशस्वीरित्या पोहोचवण्यात आली आहे.
इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीबही ठार?
इस्रायली संरक्षणदलाने (आयडीएफ) केलेल्या हल्ल्यात इराणचे गुप्तचर मंत्री, इस्माईल खतीब यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी बुधवारी केला. खतीब रात्री झालेल्या हल्ल्यात मारले गेल्याचे सांगितले जात आहे. तथापि, इराणकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. इस्रायलने पुष्टी केल्यानंतर इस्माईल खतीब यांचाही मृत्यू झाल्याची चर्चा आहे.इस्रायली हल्ल्यांमध्ये अली लारीजानी आणि त्यांच्या मुलाच्या नुकत्याच झालेल्या हत्येमुळे या प्रदेशातील परिस्थिती आणखी विघळली आहे.
अशा आव्हानात्मक काळात भारताची वैद्यकीय मदत केवळ राजनैतिकच नव्हे, तर मानवतावादी दृष्टिकोनातूनहीअत्यंत महत्वाची मानली जाते. भारत सरकारने युद्धयस्त इराणला मदतीचा हात पुढे करताना तेहरानला वैद्यकीय मदतीची पहिली खेप पाठवली आहे. भारताने पाठवलेली जीवनरक्षक औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची ही खेप इराणी रेड क्रेसेंट सोसायटीकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आली आहे.