For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा विकास दर 6.1 टक्के राहणार : मूडीजचा अंदाज

06:40 AM Apr 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारताचा विकास दर 6 1 टक्के राहणार   मूडीजचा अंदाज
Advertisement

कोलकाता :

Advertisement

रेटिंग एजन्सी मूडीज यांनी अलीकडेच भारताच्या विकास दरासंबंधीचा अंदाज वर्तवला आहे. रेटींग एजन्सीनुसार यावर्षी भारताचा विकासदर 6.1 टक्के इतका राहू शकतो. हा जो विकास दर कंपनीने जाहीर केला आहे तो मागच्या तुलनेमध्ये घटवलेला आहे. याआधी मूडीजने 2025 साठी विकास दराचा अंदाज मार्चमध्ये 6.4 टक्के व्यक्त केला होता.

का घटवला अंदाज

Advertisement

सुधारीत जीडीपी दर मूडींजने 6.1 टक्के इतका जाहीर केला आहे. हा दर घटवण्यामागे सध्याची स्थिती कारण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारी शुल्काच्या पार्श्वभूमीवर व एकंदरीतच जागतिक अनिश्चितेच्या स्थितीचा कानोसा घेऊन मूडीजने नव्याने आपला अंदाज घटवला आहे.

मूडीजने म्हटल्याप्रमाणे हिरे, कपडे आणि वैद्यकीय उपकरणांवर व्यापार शुल्क लावला गेल्यास निर्यात घटण्याची शक्यता अधिक दिसून येते. या योगे पाहता अमेरिकेसोबत व्यापार तूट अधिक वाढू शकते. सध्याला ट्रम्प यांनी चीन वगळता इतर देशांवरील व्यापारी शुल्क तूर्त 90 दिवसांसाठी अंमलबजावणी करणे टाळलेले आहे. त्यामुळे सध्यातरी याचा काहीसा लाभ भारतातील कंपन्यांना घेता येणार आहे. तरीही व्यापारी शुल्क पूर्णपणे लागू केले गेल्यानंतर भारताचा जीडीपी दर 0.3 टक्के इतका खाली येऊ शकतो.

अर्थव्यवस्थेला मिळणार गती

येत्या काळात सरकार जास्तीत जास्त भांडवल गुंतवणूक करणार आहे. करामध्ये सवलत त्याचप्रमाणे बँकांकडून व्याजदरामध्ये दिली जाणारी सवलत यामुळे विक्री वाढीला वाव मिळणार आहे. बँकांकडून व्याजदर घटवल्याने घरांची मागणी वाढणार आहे. याचा लाभ भारतीय अर्थव्यवस्थेला सकारात्मक होऊ शकणार आहे. या दरम्यान बँकिंग क्षेत्रामध्ये स्थिरता राहणार असल्याचे मूडीज यांनी म्हटले आहे.

आरबीआय, नोम्युराचा अंदाज

आर्थिक वर्ष 2025-26 करता भारताचा जीडीपी दर हा 6.5 टक्के इतका असेल, असे भाकीत आरबीआयने मांडले आहे. मागचे आर्थिक वर्ष म्हणजे 2024-25 मधील 6.30 टक्के विकासदरापेक्षा यावेळी विकासदर अधिक पाहायला मिळेल. याचदरम्यान नोम्युरा यांनी 2025 मध्ये भारत 5.9 टक्के दराने विकास साधणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यांनी यापूर्वी जीडीपी दराचा अंदाज 6.0 टक्के वर्तवला होता.

Advertisement
Tags :

.