महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताचा जीडीपी 6.6 टक्क्यांवर राहणार

06:21 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जागतिक बँकेने व्यक्त केला अंदाज : जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत वेगाने वाढणार

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

जागतिक बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा जीडीपी अंदाज 6.6 टक्के राखला आहे. यापूर्वी एप्रिलमध्येदेखील बँकेने आर्थिक वर्ष 2025 साठी भारताचा जीडीपी 6.6 टक्के अंदाज वर्तवला होता. जागतिक बँकेने म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत सर्वात वेगाने वाढणारा देश राहील. मात्र, भारताचा विस्तार मंदावण्याची अपेक्षा आहे. जागतिक बँकेने अहवाल दिला की, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उच्च वाढ झाल्यानंतर, आर्थिक वर्ष 2024-25 पासून सुरू होणाऱ्या तीन आर्थिक वर्षांसाठी सरासरी 6.7 टक्के प्रतिवर्षी स्थिर वाढ अपेक्षित आहे.

2026 मध्ये अर्थव्यवस्था 6.7 टक्के राहणार

जागतिक बँकेने भारताची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 26 मध्ये 6.7 टक्के आणि आर्थिक वर्ष 27 मध्ये 6.8 टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच वेळी, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) ने आर्थिक वर्ष 24 मध्ये 8.2 टक्के जीडीपी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

जीडीपी म्हणजे काय?

जीडीपी हा अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात सामान्य निर्देशकांपैकी एक आहे. जीडीपी विशिष्ट कालावधीत देशात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य दर्शवते. त्यात देशाच्या हद्दीत उत्पादन करणाऱ्या विदेशी कंपन्यांचाही समावेश आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article