महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताचा जीडीपी 4 ट्रिलियन डॉलर्सवर

06:55 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी शेअर केला स्क्रीनशॉट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार (जीडीपी) प्रथमच 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतर अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर जीडीपी दर्शविणारा स्क्रीनशॉट शेअर करत माहिती दिली. मात्र, सरकारच्यावतीने अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जीडीपी दर्शविणाऱ्या यादीमध्ये भारत सध्या पाचव्या क्रमांकावर असून अमेरिका, चीन हे दोन देश अव्वल स्थानी आहेत. तर, जपान आणि जर्मनी यांचा अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक असून दोघांचाही जीडीपी दर 4 ते 5 ट्रिलियन डॉलर्सच्या दरम्यान आहे.

जीडीपी हा अर्थव्यवस्थेचा मागोवा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात सामान्य निर्देशकांपैकी एक आहे. सदर जीडीपी एका विशिष्ट कालावधीत देशात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य दर्शवते. यामध्ये देशाच्या हद्दीत उत्पादन करणाऱ्या विदेशी कंपन्यांचाही समावेश आहे. जेव्हा अर्थव्यवस्था निरोगी असते, तेव्हा बेरोजगारीची पातळी सामान्यत: कमी असते. गेल्या काही वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारल्यामुळे जीडीपीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

रविवारी, सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. सदर ईमेजमध्ये विविध देशांच्या जीडीपीची स्थिती दर्शविण्यात आली आहे. या यादीत भारताने 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केलेला दिसतो. त्याच अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातमधील आमदार रिवाबा जडेजा आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर स्क्रीनशॉट शेअर केला आहे. याशिवाय भारताचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनीही भारताला 4 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनल्याबद्दल अभिनंदन केले आहे. मात्र नंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. तसेच यासंबंधी सरकारकडूनही अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती आलेली नाही.

व्हायरल स्क्रीनशॉटनुसार टॉप फाईव्ह देश

देश                                 जीडीपी

अमेरिका                   26.70 ट्रिलियन डॉलर्स

चीन                   19.24 ट्रिलियन डॉलर्स

जपान               4.39 ट्रिलियन डॉलर्स

जर्मनी              4.28 ट्रिलियन डॉलर्स

भारत                4.00 ट्रिलियन डॉलर्स

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#Sport
Next Article