भारताचे गॅस, तेल आयात बील 12 टक्क्यांनी घटले
नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-ऑक्टोबरमध्ये भारताचे निव्वळ तेल आणि वायू आयात बिल 12 टक्क्यांनी घटले आहे. यामध्ये पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण सेल (पीपीएसी) च्या आकडेवारीनुसार, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या सात महिन्यांत दोन्हीसाठी निव्वळ आयात बिल 69.9 अब्ज डॉलर्सवर घसरले, जे गेल्या वर्षी याच कालावधीत 75.9 अब्ज डॉलर्स होते. भारताने आपल्या देशांतर्गत कच्च्या तेलाच्या 90 टक्के आणि नैसर्गिक वायूच्या 50 टक्के आयात केली. भारताने पूर्वीइतकीच कच्च्या तेलाची आयात केली, परंतु कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे बचत झाली.
भारत सऊदीतून करणार कच्चे तेल आयात
भारत आता यापुढे रशियातून तेलावर आयातीवर निर्बंधानंतर सऊदी अरबमधून कच्चे तेल आयात करण्याची तयारी करत आहे. भारतासह इतर आशियाई देशही हा मार्ग अनुसरतील असे म्हटले जात आहे. भारत पुढील महिन्यापासून सऊदी अरामकोमधून कच्चे तेल आयात करण्याचे प्रमाण वाढवेल. दुसरीकडे चीनने सऊदीमधून कच्च्या तेलाच्या आयातीत घट केली आहे. भारतासह जपान, दक्षिण कोरिया व तैवान हे देश डिसेंबरमध्ये 18 ते 20 दशलक्ष बॅरेल्सची मागणी नोंदवू शकतात. भारताची तेलाची खरेदी 5 दशलक्ष बॅरेल्स प्रतिमहिना वाढली आहे.