For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताच्या चार महिला मल्ल अंतिम फेरीत

06:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताच्या चार महिला मल्ल अंतिम फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/अमान (जॉर्डन)

Advertisement

येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या मानसी लाठर, पुलकित, नेहा व आदिती कुमारी या चार महिला मल्लांनी विविध वजन गटात अंतिम फेरी गाठली. महिलांच्या 43 किलो वजन गटातील उपांत्य लढतीत भारताच्या आदिती कुमारीने युक्रेनच्या कॅरोलिना शेपरिकचा 10-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. या वजन गटातील यापूर्वीच्या सामन्यात आदिती कुमारीने मारियाम मोहम्मद अबदेलाईचा 4-2 अशा गुणांनी तर त्यानंतर अॅलेक्सेंड्रा बेरेझोवेस्कियाचा 8-2 अशा गुणांनी पराभव केला. आता आदिती कुमारीची अंतिम लढत ग्रिसच्या मारिया गिकीकाशी होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.