For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय विदेशी चलन साठा 963 दशलक्ष डॉलर्सने वाढला

06:05 AM Jun 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय विदेशी चलन साठा 963 दशलक्ष डॉलर्सने वाढला
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

19 जून रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा विदेशी चलन साठा 963 दशलक्ष डॉलर्सने वाढून 672.587 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.

या आधीच्या म्हणजे 12 जून रोजी संपलेल्या आठवड्यात पाहता विदेशी चलन साठा 9.985 अब्ज डॉलरने कमी झाला होता, जो 671.625 अब्ज डॉलर्सवर राहिला. यासोबत 19 जूनला संपलेल्या आठवड्यामध्ये विदेशी चलन मालमत्ता 3.072 अब्ज डॉलर्सने कमी होऊन 541.217 अब्ज डॉलर्सवर राहिली होती. दुसरीकडे सुवर्ण साठा 4.110 अब्ज डॉलर्सने वाढून 107.930 अब्ज डॉलर्सवर सदरच्या आठवड्यात राहिला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.