भारताचा विदेशी चलन साठा 1.01 अब्ज डॉलरने घटला
06:18 AM Jul 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
भारताचा विदेशी चलन साठा 20 जून रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये 1.01 अब्ज डॉलर्सने घटून 697.93 डॉलर्सवर खाली आला होता. याच्या मागच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 2.29 अब्ज डॉलर्सने वाढत 698.95 डॉलर्स पर्यंत पोहोचला होता. लक्षात घ्या की सप्टेंबर 2024 मध्ये विदेशी चलन साठ्याने 704.885 अब्ज डॉलरची सर्वकालिक उच्चांकी प्राप्त केली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार सदरच्या आठवड्यामध्ये देशाचा सुवर्ण साठा मात्र घटलेला दिसून आला. देशाचा सुवर्ण साठा 573 दशलक्ष डॉलरने कमी होत 85.74 अब्ज डॉलर्सवर घसरला.
Advertisement
Advertisement