भारताचा विदेशी चलन साठा 688 अब्ज डॉलर्सवर
06:51 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
भारताच्या विदेशी चलन साठ्यात सलग आठव्या आठवड्यात वाढ झाली आहे. 25 एप्रिलला संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन साठा 1.98 अब्ज डॉलरने वाढून 688.13 अब्ज डॉलर्सवर पोहचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे.
याआधीच्या आठवड्यात विदेशी चलन साठा 8.31 अब्ज डॉलर्सने वाढत 686.14 अब्ज डॉलर्सवर पोहचला होता. हे पाहता सलग आठव्या आठवड्यात विदेशी चलन साठा वाढीच्या दिशेने सरकताना दिसला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये विदेशी चलन साठा 704.89 अब्ज डॉलर्स या सर्वकालीक उच्चांकावर पोहचला होता. 25 एप्रिलच्या आठवड्यात विदेशी चलन मालमत्ता 2.17 अब्ज डॉलर्सने वाढुन 580.66 अब्ज डॉलर्सवर पोहचली. 2 हजार रुपयाची नोट बाजारातून मागे घेण्यात येण्याला दोन वर्षे उलटली असून 6,266 कोटी रुपयांच्या 2हजाराच्या नोटा आजही चलनात आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement