श्रीलंकेतील निवडणुकीवर भारताचे लक्ष
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आज सोमवारी श्रीलंकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या देशात अराजकाचा उद्रेक 2 वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतरची ही अध्यक्षपदासाठीची प्रथमच निवडणूक होत आहे. ही निवडणूक एका विचित्र परिस्थितीत होत आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले असून भारत आणि चीन या दोन देशांसाठी या निवडणुकीचा परिणाम महत्वाचा ठरणार आहे. या देशातील दोन प्रमुख पक्ष म्हणजे युनायटेड नॅशनल पक्ष आणि श्रीलंका फ्रिडम पक्ष यांनी या निवडणुकीत उमेदवार उतरविलेले नाहीत. श्रीलंका फ्रिडम पक्षाचे नेते विक्रमसिंघे हे ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवित आहेत. एक चीनसमर्थक उमेदवारवही या स्पर्धेत असून मतदानपूर्व सर्वेक्षणांमध्ये तो आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. श्रीलंकेची पुढची धोरणे कोणती असतील हे या निवडणुकीच्या परिणामावरुन ठरणार आहे, असे आंतरराष्ट्रीय राजकीय अभ्यासकांचे मत आहे.