महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारताचे एफएमसीजी क्षेत्र मजबूत : परांजपे

06:52 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशातील सर्वात मोठी ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर (एचयूएल) चे बिगर-कार्यकारी अध्यक्ष नितीन परांजपे यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना सांगितले की, भारतातील जलद गतीने चालणारे ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) क्षेत्र अजूनही मजबूत आहे. देश समृद्ध होत असून अनेक लोक ग्राहक वर्गात सामील होत असून त्यांचे उत्पन्नही वाढत असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

नितीन म्हणाले, ‘आपला दरडोई खर्च खूपच कमी आहे. एफएमसीजी  श्रेणीतील दरडोई खर्च सुमारे 50 डॉलर आहे. जर तुम्ही इंडोनेशियासारख्या दक्षिण पूर्व आशियाई देशांकडे पाहिले तर दरडोई खर्च 250 डॉलरच्या आसपास आहे आणि थायलंडमध्ये तो 350 डॉलरच्या जवळपास आहे.’

ते म्हणाले की, भारताने 2030 पर्यंत 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्यासाठी उद्योगांसह इतर घटकांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत.

परांजपे म्हणाले, ‘ विकास मात्र सध्याला वेगावर स्वार असून आर्थिक स्थितीही नियंत्रणात आहे. गेल्या दशकात आपण जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहोत. सध्याला विकास दराचा विचार केल्यास अमेरिका आणि ब्रिटनचा 2 टक्के, जपानचा एक टक्के आणि चीनचा विकास दर 7 टक्क्यांच्या जवळपास आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article