महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशातील पहिले रियुजेबल हायब्रीड रॉकेट प्रक्षेपित

06:29 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

53 उपग्रहांसह सबऑर्बिटलमध्ये रवाना : ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलाच्या संशोधनात मदत होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

भारताने शनिवारी आपल्या पहिल्या पुन्हा वापरता येण्याजोग्या हायब्रीड रॉकेट ‘आरएचयुएमआय-1’ची यशस्वी चाचणी केली. चेन्नई येथून मार्टिन ग्रुपच्या सहकार्याने तामिळनाडूस्थित स्टार्ट-अप स्पेस झोन इंडियाने चाचणी यशस्वीरित्या प्रक्षेपित केली. मोबाईल लाँचर वापरून रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले. याने 50 पिको उपग्रह आणि तीन क्मयूब उपग्रहांचा पेलोड वाहून एका सबऑर्बिटल मार्गावर प्रवास केला. हे उपग्रह ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलाशी संबंधित संशोधनासाठी डेटा गोळा करतील.

भारताने चेन्नईतील तिऊविदंधाई येथून मोबाईल लाँचरद्वारे रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट तामिळनाडूस्थित स्टार्टअप स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुपने संयुक्तपणे तयार केले आहे. ‘आरएचयुएमआय-1’ रॉकेट जेनेरिक इंधनावर आधारित हायब्रिड मोटर आणि इलेक्ट्रिकली ट्रिगर पॅराशूट सिस्टमने सुसज्ज आहे. लवचिकता आणि पुन: वापरण्यावर लक्ष केंद्रित करून रॉकेटची खास रचना करण्यात आली आहे. हायब्रीड रॉकेट ‘आरएचयुएमआय-1’मध्ये इको-फ्रेंडली आणि किफायतशीर यंत्रणा आहे. यात असलेल्या पॅराशूट प्रणालीच्या मदतीने रॉकेटचे घटक सुरक्षितपणे समुद्रात परत येऊ शकतात. त्यामुळे अंतराळ प्रक्षेपणाचा खर्च कमी होईल. रॉकेटचे घटक सहजपणे पुनर्प्राप्त केले जाऊ शकतात. रॉकेटची एअर फ्रेम कार्बन फायबर आणि ग्लास फायबरपासून बनलेली आहे.

रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात पाठवलेले तीन घन उपग्रह वैश्विक किरणोत्सर्ग, अतिनील विकिरण आणि हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेऊ शकतील. या रॉकेटच्या मदतीने किरणोत्सर्गाची पातळी, कंपन आणि तापमानाची माहिती गोळा केली जाऊ शकते, असे स्पेस झोन वन कंपनीचे सीईओ आनंद मेगलिंगम यांनी सांगितले. 3.5 मीटर उंचीचे रॉकेट सकाळी 7:25 वाजता प्रक्षेपित करण्यात आले. 7 च्या मूळ नियोजित प्रक्षेपण वेळेपासून त्याला थोडासा विलंब झाला.

‘ऊमी-1’ची खासियत...

ऊमी-1 हे विशेष प्रकारचे रॉकेट असून ते दोन प्रकारचे घन इंधन आणि द्रव ऑक्सिडायझरच्या मदतीने उडते. या खास डिझाईनमुळे रॉकेटला आग लागण्याचा धोका खूप कमी झाला आहे. त्यात बसवलेले पॅराशूट उघडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सिग्नलचा वापर केला जातो. भविष्यात स्पेस झोन इंडियाचे दोन टप्प्यातील रॉकेट तयार करण्याचे उद्दिष्ट असून ते 500 किलो पेलोड वाहून नेऊ शकते. ‘आरएचयुएमआय-1’ रॉकेटने कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि ऑपरेशनचा खर्च कमी करण्यासाठी द्रव आणि घन इंधन प्रणोदकांच्या मिश्र्रणाचा वापर केला. पहिले प्रक्षेपण फेब्रुवारी 2023 मध्ये नियोजित होते. त्यावेळी पॅराशूट तैनात करण्यात समस्या आल्यामुळे रॉकेट समुद्रात गायब झाले होते. अशीच घटना टाळण्यासाठी टीमने या प्रक्षेपणासाठी अनेक टायमर समाविष्ट केले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article