भारताचा भर सामुहिक प्रगतीवर
जोधपूर : सध्या काही देश एकमेकांशी युद्ध करत असून भारताचा भर विश्वसमुदायाच्या एकात्मतेवर आहे. इतर देशांशी सहकार्य करुन आपली आणि त्यांची प्रगती साध्य करण्याच्या मार्गाला आम्ही प्राधान्य देत आहोत, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले आहे. ते जोधपूर येथे ‘तरंगशक्ती’ या भारतीय वायुदलाच्या विमानो•ाण कसरतींच्या कार्यक्रमात भाषण करीत होते. सध्या काही देश युद्धात गुंतले असले तरी भारताच्या तत्वानुसार युद्ध हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही. शांततेच्या मार्गाने चर्चा करुनच अवघडातील अवघड समस्या सोडविली जाऊ शकते असा आमचा विश्वास आहे. त्या दिशेने भारत सध्या प्रयत्न करीत आहे. विश्वसमुदायाची भावनाही अशीच आहे. भारताने अन्य देशांशी सहकार्य करुन प्रगतीचा मार्गावर अग्रेसर होण्याचे धोरण अवलंबिले असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.