महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘भारताची निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव’

06:22 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचे सुतोवाच

Advertisement

वृत्तसंस्था/ अपुलिया, रोम

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या समकक्ष जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून गेले दोन दिवस जी-7 शिखर परिषदेत सहभाग नोंदवला. या महिन्यात तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. जी-7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर शनिवारी पंतप्रधान इटलीहून दिल्लीला परतले. तत्पूर्वी, त्यांनी परिषदेत बोलताना भारतीय लोकशाहीचे महत्त्व जागतिक नेत्यांसमोर कथन केले. भारतात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुका हा ‘लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव’ असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ‘एआय’ म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्ससंबंधीही त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. ‘एक्स’ या सोशल साईटवर ट्विट करून पंतप्रधानांनी जी-7 परिषदेच्या बैठकीची माहिती दिली.

पंतप्रधान मोदी शिखर परिषदेत म्हणाले की, आपल्याला तंत्रज्ञान विधायक बनवायचे आहे, विघटनकारी बनवायचे नाही. तरच आपण सर्वसमावेशक समाजाचा पाया रचू शकू. मानव-केंद्रित दृष्टीकोनातून भारत नेहमीच चांगल्या भविष्यासाठी प्रयत्नशील असतो. कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत (एआय) राष्ट्रीय धोरण तयार करणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

जनतेने तिसऱ्यांदा दिली संधी

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘भारतातील निवडणुका हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. जनतेने मला तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली आहे. 6 दशकात पहिल्यांदाच एखाद्याला सलग तिसऱ्यांदा जनादेश मिळाला आहे. विकसित भारताची निर्मिती हाच आमचा संकल्प आहे. जी-7 मध्ये सहभागी होण्याचा भारताला अभिमान असून भविष्यातही संवाद आणि सहकार्य सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.

आईच्या नावाने एक झाड लावा!

जी-7 परिषदेत आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत ‘सीओपी’ची वचनबद्धता निर्धारित कालावधीपूर्वी पूर्ण करण्यासाठी काम करत आहे. मिशन लाइफच्या तत्त्वांवर आधारित हरित युग सुरू करण्यासाठी आम्ही काम करत आहे. आपला ग्रह अधिक शाश्वत बनवण्यासाठी पंतप्रधानांनी “आईच्या नावाने एक झाड” लावा असा मौलिक सल्ला देत या मोहिमेवर प्रकाश टाकला.

पोप फ्रान्सिस यांना भारतभेटीचे निमंत्रण

जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे लवकरच पोप फ्रान्सिस भारत दौऱ्यावर येण्याची शक्मयता आहे. परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी 87 वषीय पोप फ्रान्सिस यांना आलिंगन देत काहीवेळ हलक्मया-फुलक्मया आवेशात चर्चाही केली. पोप फ्रान्सिस यांना 2016 आणि 2021 मध्ये पंतप्रधान मोदींनी भारत भेटीसाठी आमंत्रित केले होते. पण ते आले नव्हते. आता यावेळीही पंतप्रधान मोदींनी व्हॅटिकनचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांना इटलीतील जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने भारतभेटीचे निमंत्रण दिले. आता पोप फ्रान्सिस येणार की नाही, कधी येणार हे पाहायचे आहे. जर ते आले तर हिंदू बहुसंख्य राष्ट्राची ही त्यांची पहिली भेट ठरणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article