For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शॉटगन वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत भारताची निराशा

06:29 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
शॉटगन वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत भारताची निराशा
Advertisement

वृत्तसंस्था, टँजियर (मोरोक्को)

Advertisement

येथे झालेल्या आयएसएसएफच्या विश्वचषक शॉटगन नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी साफ निराशा केली. भारतीय नेमबाजी संघाला या स्पर्धेतून पदकाविना माघारी परतावे लागले.

या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिलांच्या स्किट तसेच ट्रॅप प्रकारात भारताची जोडी पृथ्वीराज तोंडाईमन आणि किर्ती गुप्ता यांची कामगिरी असमाधानकारक झाली. नेमबाजीच्या या क्रीडा प्रकारात एकूण 33 देशांचे संघ सहभागी झाले होते. भारताच्या या जोडीने सरासरी 134 गुण नोंदवित 18 वे स्थान मिळविले. भारताची आणखी एक जोडी किनान चेन्नाई आणि राजेश्वरी कुमारी यांना 25 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Advertisement

आता आयएसएसएफसी पुढील विश्वचषक शॉटगन नेमबाजी स्पर्धा मे महिन्यात कझाकस्तानमध्ये घेतली जाणार असून या स्पर्धेसाठी भारताने यापूर्वी आपला संघ जाहीर केला आहे. मोरोक्कोमधील स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय नेमबाज संघातील काही नेमबाजांनी कझाकस्तानमधील स्पर्धेसाठी आपले स्थान राखले आहे.

Advertisement
Tags :

.