For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये भारताची निराशा

06:07 AM Sep 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये भारताची निराशा
Advertisement

वृत्तसंस्था/ ग्वांगजू, दक्षिण कोरिया

Advertisement

येथे सुरू असलेल्या वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पुरुष कंपाऊंड संघाला स्वप्नवत कामगिरीची पुनरावृत्ती विभागात करता आली नाही. सांघिक सुवर्ण मिळविणाऱ्या रिषभ यादव, अमन सैनी व प्रथमेश फुगे यांचे वैयक्तिक कंपाऊंड आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले.

सांघिक स्पर्धेत या तिघांनी सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्यामुळे वैयक्तिक विभागातही त्यांच्याकडून क्लीन स्वीपची अपेक्षा केली जात होती. पण त्यांना उपांत्यपूर्व फेरीतच पराभव स्वीकारावा लागल्याने मागील मिळविलेले वैयक्तिक कंपाऊंडचे सुवर्णपदक यावेळी राखता आले नाही. 2023 मध्ये बर्लिनमध्ये झालेल्या मागील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ओजस देवतळेने वैयक्तिक कंपाऊंडचे सुवर्ण मिळविले होते. मात्र यावेळी निवडचाचणीवेळी देवतळेला यश मिळाले नसल्याने त्याला संघात स्थान मिळाले नाही. महिलांची वैयक्तिक कंपाऊंड स्पर्धा बाकी असून त्यांच्याकडून आता अपेक्षा केली जात आहे.

Advertisement

प्रथमेश फुगेची घोडदौड डेन्मार्कच्या जागतिक द्वितीय मानांकित मथायस फुलर्टनने 148-148 (10-9) असे रोमांचक शूटऑफमध्ये संपुष्टात आणले. दोघेही 22 वर्षांचे असून फुगेने आधीच्या फेरीत माईक स्क्लोएसरवर मात करताना 150 पैकी 150 गुण मिळविले होते. उपांत्यपूर्व फेरीत फुगेने चौथ्या एन्डपर्यंत फुलर्टनवर 119-118 अशी आघाडी घेतली होती. फायनलच्या आधी फुगेने एक गुण गमविण्याची चूक त्याला महाग पडली आणि फुलर्टनने 148-148 अशी बरोबरी साधल्यानंतर शूटऑफमध्ये विजय मिळविला.

भारताचा नंबर वन तिरंदाज रिषभ यादवलाही फ्रान्सच्या निकोलास गिरार्डकडून चुरशीच्या लढतीत 145-146 असा पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या मालिकेच्या आधीच्या फेरीत यादवने एका गुणाची आघाडी वाया घालवली आणि शेवटच्या फेरीत दोन गुण गमविल्याने त्याला बाहेर पडावे लागले. अमन सैनीला अमेरिकेच्या कुर्टिस ब्रॉडनॅक्सने 147-144 असे हरविले.

Advertisement
Tags :

.