टेटे, घोडेस्वारी, सेपकटकरॉ, ई-फुटबॉलमध्ये भारताची निराशा
वृत्तसंस्था, नागोया :
येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या टेबल टेनिस पुरुष व महिला संघांचे आव्हान समाप्त झाले तर घोडेस्वारीत निराशाजनक सुरुवात झाली. सेपकटकरॉमध्ये उपांत्य फेरीत भारत पराभूत झाला आणि ई-फुटबॉलमध्ये गट फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले.

टेबल टेनिसमध्ये भारतीय महिला, पुरुष संघ स्पर्धेबाहेर
एशियन गेम्सच्या टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय महिला संघाला उपांत्यपूर्व फेरीत उत्तर कोरियाकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला. यामुळे महिला संघाचे आव्हान संपुष्टात आले. त्याआधी भारतीय पुऊष संघाला राउंड ऑफ 16 मध्येच स्पर्धेबाहेर पडावे लागले. भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठताना थायलंडचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला होता. मात्र क्वार्टरफायनलमध्ये उत्तर कोरियाविऊद्ध भारताला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
पुरुष संघाचेही आव्हान संपले
भारतीय पुऊष संघालाही दक्षिण कोरियाविऊद्ध पराभव पत्करावा लागला. हरमीत देसाईने पहिला गेम 11-8 असा जिंकत चांगली सुऊवात केली. मात्र त्यानंतर कोरियाच्या जंग वू-जिनने सलग तीन गेम जिंकत सामना 3-1 (8-11, 11-7, 11-8, 11-9) असा आपल्या नावावर केला. दुसऱ्या सामन्यात मनुष शाहने पहिला गेम 4-11 असा गमावला, पण पुढील दोन गेम जिंकून पुनरागमन केले. मात्र ओह जंगसॉन्गने अखेर 3-2 (4-11, 11-8, 13-11, 11-13, 6-11) असा सामना जिंकला. यानंतर मानव ठक्कर यालाही अन जे-ह्यूनकडून 1-3 (10-12, 6-11, 11-7, 10-12) असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय पुऊष संघाचेही एशियन गेम्समधील आव्हान संपुष्टात आले.
घोडेस्वारीत भारताची निराशाजनक सुऊवात
नागोया : एशियन गेम्समधील भारताच्या घोडेस्वारी मोहिमेला निराशाजनक सुऊवात झाली. मंगळवारी इव्हेंटिंग टीम डेसेज स्पर्धेत भारत आठ संघांच्या क्रमवारीत सातव्या स्थानावर राहिला. भारताने 112.40 गुण मिळवले असून त्याच्यापेक्षा खाली इंडोनेशिया आहे. यजमान जपान 91.60 गुणांसह आघाडीवर आहे. त्यानंतर थायलंड (95.10) आणि हाँगकाँग, चीन (97.00) यांचा क्रमांक आहे. इव्हेंटिंग टीम जंपिंग स्पर्धेत मात्र भारताला बाद करण्यात आले.
वैयक्तिक डेसेजमध्ये भारताचा आशिष लिमये याने 35.50 गुणांसह 14 वे स्थान मिळवले. अर्जन सिंह नागराने 38.20 गुणांसह 23 वे स्थान मिळवले. इव्हेंटिंगच्या वैयक्तिक जंपिंगमध्ये लिमये 35.50 गुणांसह सहाव्या स्थानावर राहिला, तर फुआद मिर्झा 24 व्या स्थानावर राहिला.
सेपकटकरॉ : भारताचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त
पुऊषांच्या टीम रेगू सेपकटकरॉ स्पर्धेत भारताने फिलिपिन्सवर 2-1 असा विजय मिळवला, मात्र उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी हा विजय पुरेसा ठरला नाही. ‘रेगू’ ही तीन खेळाडूंच्या संघाची स्पर्धा आहे. उपांत्य फेरीची आशा कायम ठेवण्यासाठी भारताला फिलिपिन्सविऊद्ध 3-0 असा विजय आवश्यक होता. भारताने 2-1 असा विजय मिळवल्याने जपानने टायब्र्रेकरच्या आधारे उपांत्य फेरी गाठली. भारत, जपान आणि फिलिपिन्स या तिन्ही संघांनी प्रत्येकी तीन रेगू सामने जिंकले होते.
भारताने सुऊवातीचे दोन रेगू जिंकत आघाडी घेतली. पहिल्या रेगूमध्ये भारताने 15-7, 15-10 असा, तर दुसऱ्या रेगूमध्ये 15-9, 10-15, 15-8 असा विजय मिळवला. मात्र निर्णायक तिसऱ्या रेगूमध्ये भारताला 15-17, 11-15 असा पराभव पत्करावा लागला. भारताला यापूर्वी जपानकडून 1-2 आणि बलाढ्या मलेशियाकडून 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. जपानला मलेशियाकडून 0-3, तर फिलिपिन्सकडून 1-2 असा पराभव झाला होता. मलेशिया हा उपांत्य फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला. पुऊषांच्या टीम रेगू सेपकटकरॉमध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघाचे पदक निश्चित होते.
रोहित बेनेडिक्टन 100 मीटर बटरफ्लायच्या अंतिम फेरीसाठी अपयशी
भारतीय जलतरणपटू रोहित बेनेडिक्टन याला पुऊषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नाही. रोहितने 53.08 सेकंदांची वेळ नोंदवत आपल्या हीटमध्ये चौथे स्थान मिळवले. सर्व हीट्सच्या एकत्रित क्रमवारीत तो 13 व्या स्थानावर राहिला. या प्रकारातील पहिल्या आठ खेळाडूंनाच अंतिम फेरीत प्रवेश मिळणार होता. दरम्यान, अनुभवी भारतीय जलतरणपटू साजन प्रकाश या स्पर्धेत सहभागी झाला नाही.
ई-स्पोर्ट्स: ई-फुटबॉलमध्ये भारताचे आव्हान समाप्त
ई-फुटबॉल स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले. भारताने गट फेरीत उझबेकिस्तानविऊद्ध गोलशून्य बरोबरी साधली आणि मंगोलियाकडून वॉकओव्हर मिळवला, तरीही भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला नाही. गट इ मध्ये उझबेकिस्तान चार गुणांसह अव्वल ठरला आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रत्येक गटातील केवळ अव्वल संघाला अंतिम आठमध्ये स्थान मिळत होते. भारतानेही चार गुण मिळवले; मात्र हे गुण उझबेकिस्तानविऊद्धच्या बरोबरीतून आणि मंगोलियाकडून मिळालेल्या वॉकओव्हरमधून आले. त्यामुळे भारताला गटात दुसरे स्थान मिळाले. भारताविऊद्ध बरोबरी साधल्यानंतर उझबेकिस्तानने मंगोलियाचा पराभव केला. या विजयातून मिळालेल्या तीन गुणांमुळे उझबेकिस्तानला गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठता आली.