नेमबाजीत भारताची निराशा
वृत्तसंस्था / डोहा
2025 च्या हंगामाअखेरीस येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत शनिवारी पहिल्या दिवशी भारतीय नेमबाजांकडून साफ निराशा झाली. भारताचे नेमबाज माजी विश्वविजेता रुद्रांश पाटील आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरी प्रवेश मिळविणाऱ्या अर्जुन बाबुता यांची पदके हुकली. तर महिलांच्या विभागात इलाव्हेनील व्हॅलेरव्हेनला पात्रफेरीमध्ये नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पुरूषांच्या 10 मी. एअररायफल नेमबाजीत रुद्रांश पाटीलला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने 631.9 गुण नेंदविले. बाबुताने 633.3 गुण नोंदविले. पण त्यालाही चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारात चीनच्या शेंग लिहाओने 637.7 गुणांसह सुवर्णपदक तर स्वीडनच्या विक्टर लिंडग्रेनने 633.5 गुणांसह रौप्यपदक तसेच हंगेरीच्या पेनीने कांस्यपदक मिळविले. महिलांच्या 10 मी. एअररायफल नेमबाजीत इलाव्हेनीलला पात्र फेरीत नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने 630 गुण नोंदविले.