भारताची कॉफी निर्यात 10 टक्क्यांवर राहणार
आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रमी किंमती असूनही घटीचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील कॉफीची मागणी वर्षभर अधिक राहिली आहे. सध्या जागतिक पातळीवर त्याची मागणी आणि किंमत दोन्ही जास्त आहे. असे असूनही यावर्षी भारतातून कॉफीची निर्यात 10 टक्क्यांपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सध्या जागतिक स्तरावर कॉफीचा पुरवठा कमी झाल्यामुळे भारतीय कॉफीला मागणी वाढली आहे. युरोपीयन खरेदीदार 2024च्या युरोपियन युनियनच्या पहिल्या जंगलतोडीच्या वर्षापेक्षा कमी गतीने खरेदी करत आहेत.
निर्यातीवर होणार परिणाम
भारतीय कॉफीला अजूनही मागणी असली तरी, भारत नजीकच्या काळात त्याची निर्यात कमी करेल. यामागील कारण उत्पादनात घट आहे. वेगाने बदलणारे हवामान, अतिवृष्टी आणि उष्णता यामुळे कॉफी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन मिळाले. त्याचा परिणाम आता निर्यातीवरही दिसून येऊ लागला आहे. जागतिक बाजारात कॉफीची मागणी जास्त असतानाही भारतामधून निर्यातीचा वेग कमी असल्याचे दिसून येत आहे.
2023-24 या वर्षात भारतात 3,74,200 मेट्रिक टन कॉफीचे उत्पादन झाले. ज्यामध्ये 1,13,000 टन अरेबिका कॉफी आणि 2,61,200 टन रोबस्टा कॉफीचा समावेश होता. परंतु यावर्षी खराब हवामानामुळे कॉफी पिकावर याचा परिणाम झाला आहे.
जागतिक पुरवठा घटतोय
केवळ भारतातच नव्हे तर ब्राझीलमध्येही कॉफी उत्पादन कमी होत आहे. या क्षेत्रातील मोठे देश म्हणून उदयास येत असलेल्या इटली, जर्मनी आणि बेल्जियमनेही निर्यातीत कपात केली आहे.
कमतरतेमुळे किंमती गगनाला
ब्राझीलमध्ये कॉफीच्या कमी उत्पादनाचा फायदा भारताला अजूनही मिळत आहे. भारतीय रोबस्टा कॉफीला उच्च दर मिळत आहेत. लंडनच्या फ्युचर्स मार्केटमध्ये भारतीय रोबस्टा कॉफीची किंमत प्रति टन 250 डॉलर आहे.