For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात

06:03 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात
Advertisement

प्रणॉय, आकर्षी कश्यप, सिक्कि-सुमीत यांचा पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत एच. एस. प्रणॉय तसेच आकर्षी कश्यप यांच्या पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

Advertisement

पुरुष एकेरीच्या शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात जपानच्या कोदाई नाराओकाने एच. एस. प्रणॉयचा 21-19, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव केला. सुपर 500 दर्जाच्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय बॅडमिंटनपटूंना उपांत्यपूर्व फेरी पार करता आली नाही. त्याचप्रमाणे पुरुष एकेरीत समीर वर्माचेही आव्हान प्रणॉयच्या लढतीपूर्वीच संपुष्टात आले होते. मिश्र दुहेरीत एन. सिक्कि रे•ाr व बी. सुमीत रे•ाr यांना पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत भारताच्या आकर्षी कश्यपलाही उपांत्यपूर्व फेरीत तैवानच्या पेई पोकडून पराभव हार पत्करावी लागली.

पुरुष एकेरीच्या सामन्यात जपानच्या नाराओकाने तासाभराच्या कालावधीत प्रणॉयचे आव्हान संपुष्टात आणले. मिश्र दुहेरीच्या सामन्यात जियान झेन बेंग आणि वेई झिन यांनी सुमीत आणि सिक्कि रे•ाr यांचा 21-12, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. हा सामना 35 मिनिटे चालला होता. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीन तैपेईच्या यु पेईने आकर्षी कश्यपवर 42 मिनिटाच्या कालावधीत 21-17, 21-12 अशा गेम्समध्ये मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या लढतीमध्ये तैवानच्या पेईने पहिल्या गेममध्ये दर्जेदार खेळ करत सुरुवातीला मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर आकर्शीने ती आघाडी बरीच कमी केली. पण तिला हा गेम जिंकता आला नाही. दुसऱ्या गेममध्ये आकर्शीकडून परतीचे फटके मारताना वारंवार चुका झाल्याने चीन तैपेईच्या पेईने ही लढत एकतर्फी जिंकली. या स्पर्धेत आकर्षीने ऑस्ट्रेलियाच्या तेओचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता. महिला एकेरीमध्ये भारताच्या मालविका बनसोड आणि अनुपमा उपाध्याय यांचे आव्हान दुसऱ्या फेरीतच समाप्त झाले. इंडोनेशियाच्या सातव्या मानांकित इस्टेर वेर्दोयोने मालविकाचा 21-17, 23-21 तर दुसऱ्या एका सामन्यात इंडोनेशियाच्या वेर्दानीने अनुपमाचा 21-11, 21-18 असा पराभव केला. या स्पर्धेमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.

Advertisement

.