For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रॅक सायकलिंगमध्ये भारताचे आव्हान समाप्त

05:07 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रॅक सायकलिंगमध्ये भारताचे आव्हान समाप्त
Advertisement

वृत्तसंस्था, नागोया

Advertisement

आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी ट्रॅक सायकलिंगमधील पुरुष आणि महिलांच्या टीमस्प्रिंट तसेच महिलांच्या टीम पर्शुट प्रकारांत भारतीय संघांचे पदकाच्या शर्यतीतील आव्हान संपुष्टात आले.

महिलांच्या टीम स्प्रिंट प्रकारात सेलेस्टिना, सरिता कुमारी, कीर्ती रंगास्वामी आणि त्रियाशा पॉल यांच्या चौकडीने पहिल्या फेरीतील शर्यतीत 50.431 सेकंदांची वेळ नोंदविली. चीन तैपेईने 49.504 सेकंदांत शर्यत पूर्ण करून आघाडी घेतली आणि कांस्यपदकाच्या शर्यतीत प्रवेश केला. पुरुषांच्या टीम स्प्रिंटमध्ये भारताच्या रोजित सिंग, डेव्हिड बेकहॅम, रोनाल्डो सिंग आणि जेमश सिंग यांनी पहिल्या फेरीतील शर्यतीत 44.374 सेकंदांची वेळ नोंदविली. चीनने 42.348 सेकंदांत शर्यत जिंकून जपानविरुद्धच्या सुवर्ण पदकाच्या शर्यतीत स्थान मिळविले.

Advertisement

महिलांच्या टीम पर्शूट प्रकारातही भारताला पदकाच्या शर्यतीत आगेकुच करता आली नाही. हर्षिता जाखड, पूजा दानोळे, मीनाक्षी आणि स्वस्ती सिंग यांनी पात्रता फेरीत 4:45.151 मिनिटांची वेळै नोंदवत पाचवे व शेवटचे स्थान मिळवले आणि पहिल्या फेरीत केवळ वेळेच्या निकषावर एकट्याने शर्यत पूर्ण केली. चीन आणि जपानने सुवर्ण पदकाच्या शर्यतीत प्रवेश केला तर उझबेकिस्तान आणि कोरिया यांच्यात कांस्यपदकासाठी लढत होईल. त्यामुळे, ट्रॅक सायकलिंगच्या या तीनही प्रकारांतील पदकाच्या शर्यतींमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व नसेल.

Advertisement
Tags :

.