For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा मकाववर मोठा विजय

06:36 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचा मकाववर मोठा विजय
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

18 वर्षांखालील वयोगटातील सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या आशिया चषक आईस हॉकी स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारताने मकावचा (चीन) 8-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार गुरतेज भाटीने दर्जेदार कामगिरी करताना चार गोल नोंदविले. या सामन्यामध्ये राजस्थानच्या अजय डांगीने भारताचे खाते उघडले. त्यानंतर कर्णधार भाटीने चार गोल नोंदविले. इप्तिकार हुसेन, तानझीन ताशी आणि देवांश शर्मा यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या सामन्यात मकावतर्फे एकमेव गोल नोंदविला गेला. किर्जीस्थानमधील बिश्केक येथे 27 एप्रिल ते 3 मे दरम्यान सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 18 वर्षांखालील वयोगटातील आशिया चषक आईस हॉकी स्पर्धेतील हा वरील सामना होता. या स्पर्धेमध्ये किर्जीस्थान, मंगोलिया, उझ्बेक, इंडोनेशिया, मकाव (चीन) आणि भारत यांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.