For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचे एआय मॉडेल कॉपी करता येत नाही

06:52 AM Dec 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारताचे एआय मॉडेल कॉपी करता येत नाही
Advertisement

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला

Advertisement

मुंबई :

मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ सत्या नडेला यांनी अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांची भेट घेतली. दोघांनीही तंत्रज्ञानाच्या, विशेषत: एआयच्या भविष्याबद्दल चर्चा केली. अदानी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, नाडेला यांच्यासोबतच्या भेटीत चर्चा केली असून यावेळी एआय अॅप्सचा डेमो देखील दाखवला असल्याचे सांगितले आहे.

Advertisement

अदानी ग्रुप एआय आणि डिजिटल परिवर्तनाला गती देण्याचे उद्दिष्ट ठेवतो. ही भागीदारी ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि डिजिटल जगासारख्या भौतिक जगाला जोडण्यासाठी सिद्ध होऊ शकते. मायक्रोसॉफ्ट भारतात 1.6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या प्रेस रिलीजनुसार, ही गुंतवणूक भारताच्या वेगाने वाढणाऱ्या एआय इकोसिस्टमला पाठिंबा देईल. कंपनी वाढत्या लोकसंख्येवर एआय लागू करेल, म्हणजेच ते प्रत्येक व्यक्तीसाठी सुलभ करण्यासाठी काम करणार आहे.

30 कोटींहून अधिक कामगारांना नोकरीची सुरक्षा

मी जेव्हा जेव्हा भारतात येतो तेव्हा एआय किती वेगाने येथील लोकांचे जीवन बदलत आहे हे पाहून मला आश्चर्य वाटते. कामगार मंत्रालयासोबतची आमची भागीदारी याचे एक उत्तम उदाहरण आहे, 30 कोटींहून अधिक असंघटित क्षेत्रातील कामगारांना चांगल्या नोकऱ्या आणि सामाजिक सुरक्षिततेशी जोडत आहे. तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात लोकांना सक्षम करते तेव्हा काय होऊ शकते हे यावरून दिसून येते.

Advertisement
Tags :

.