कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारताच्या ‘अॅक्शन’ने धास्तावला पाकिस्तान

07:00 AM Apr 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/कराची

Advertisement

पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून मोठी कारवाई होण्याच्या भीतीने पाकिस्तान भयभीत झाला आहे. पाकिस्तानने 24-25 एप्रिल रोजी स्वत:च्या विशेष आर्थिक क्षेत्रात कराची किनाऱ्यावर जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या परीक्षणासाठी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय यंत्रणा या सर्व घडामोडींवर नजर ठेवून आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलली आहेत. सिंधू जल करार स्थगित करण्यासह अन्य निर्णय भारताने घेतल्याने पाकिस्तानची धास्ती वाढली आहे. भारत थेट हल्ला करू शकतो अशी भीती सतावत असल्यानेच पाकिस्तानने क्षेपणास्त्रांचे परीक्षण सुरू केले आहे.

Advertisement

पाकिस्तानने अरबी समुद्रात नोटम (वायुसैनिक/नौसैनिकांसाठी नोटीस) जारी केली. तसेच सैन्य प्रतिक्रियेच्या भीतीमुळे स्वत:च्या सैन्याला पूर्णपणे अलर्टवर ठेवले आहे. पाकिस्तानच्या नौदलाने देखील सराव केला. तर पाकिस्तानने  वायुदलाला अलर्टवर ठेवले असून एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम भारतीय विमानांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नियमित स्वरुपात उ•ाणं करत आहेत. पाकिस्तानी सैन्यप्रमुख  अत्यंत तणावाच्या काळात शक्तिप्रदर्शन करू पाहत आहेत. तसेच सीमापार दहशतवादातील पाकिस्तानच्या सहभागावरून जगाचे लक्ष हटविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच रणनीतिच्या अंतर्गत पाकने क्षेपणास्त्राचे परीक्षण जाहीर केले..

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article