For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशातील पहिला ऐतिहासिक 'पन्हाळ्याचा रणसंग्राम'लघुपट १३ डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार

03:45 PM Mar 05, 2025 IST | Radhika Patil
देशातील पहिला ऐतिहासिक  पन्हाळ्याचा रणसंग्राम लघुपट १३ डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांसमोर येणार
Advertisement

पन्हाळ्याचा संपूर्ण इतिहास जगासमोर येणारः आमदार डॉ. विनय कोरे

Advertisement

कोल्हापूरः

ऐतिहासिक पन्हाळगडाला स्वराज्यात फार मोठे महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड नंतर पन्हाळगड येथे जास्त वास्तव केले. पन्हाळ्याचा इतिहास संपूर्ण देशासह जगासमोर वेगळ्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. दिनांक ६ मार्च रोजी भारत देशातील पहिला ऐतिहासिक लघुपट १३ डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांसमोर येईल. ही एक पर्यटन व इतिहास प्रेमी शिवप्रेमींना पर्वणी ठरेल, असा विश्वास शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार डॉ.विनय कोरे यांनी व्यक्त केला. त्यांनी पन्हाळा नगरपरिषद येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

Advertisement

पर्यटन महोत्सवानिमित्त संपूर्ण गडाच्या तटबंदीला लाईट इफेक्ट करण्यात आली आहे जवळपास ४.३० किलोमीटर तटबंदी रोषणाईने उजळून गेले आहे येथील चार दरवाजा तीन दरवाजा सज्जाकोटी, पुसाटी बुरुज, नायकणीचा सज्जा, शिवमंदिर आणि विविध ठिकाणी देखील विद्युत रोषाईने उजळा देण्यात आला आहे. पन्हाळगड सध्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये सामील करण्यासंदर्भात हालचाली सुरुवात आहेत. जागतिक वारसा स्थळात पन्हाळगड गेल्यास ही एक अभिमानाची बाब राहील त्या दृष्टीने ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लाईटचा शोध लागल्यानंतर पहिल्यांदा पन्हाळा गडाला करण्यात आलेली लाईट इफेक्टमुळे रात्रीच्या पन्हाळ्याची ओळख दिसून येत आहे. हा जगातील पहिलाच प्रयोग असेल.

१३ डी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या, लघुपटाचे उद्घाटन ६ मार्च या दिवशी कोंडोजी फर्जंद यांनी पन्हाळा जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा पन्हाळगडावर आले होते आणि त्यांच्यावर सोन्याच्या फुलांची उधळण करण्यात आली होती. याचे औचित्य साधत त्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज, धैर्यशील माने धनंजय महाडिक, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती यावेळी आमदार कोरे यांनी दिली.

Advertisement
Tags :

.